मुंबई: आयपीएलच्या पहिल्या सत्रातही या खेळाडूला विशेष संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. आता दुसऱ्या सत्रातून हा खेळाडू बाहेर गेल्याची माहिती मिळाली आहे. सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यांचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नरला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आलं. जेसन रॉयने या सामन्यात वॉर्नरची जागा घेतली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वॉर्नरला IPL मध्ये यंदाच्या हंगामात खूप संघर्ष करावा लागला होता. त्याने या हंगामात खेळलेल्या 8 सामन्यांमध्ये 195 धावा केल्या आहेत. वॉर्नर आयपीएल 2021 मध्ये पुन्हा एकदा खेळताना दिसणार नाही. डेव्हिड वॉर्नरची आयपीएलमधून सुट्टी करण्यात आली आहे. 


आयपीएल टीम सनरायझर्स हैदराबादने लीगच्या 14 व्या हंगामातील उर्वरित सामन्यांसाठी डेव्हिड वॉर्नरच्या जागी केन विल्यमसनची कर्णधार म्हणून निवड केली. वॉर्नरकडून कर्णधारपद काढून घेतल्यानंतर आता तो पुढील सामन्यांमध्येही खेळेल याची खात्री नाही. हैदराबादचे कोच ट्रेवर बेलिस म्हणाले, 'आम्ही अंतिम 4 मध्ये स्थान मिळवू शकत नाही, त्यामुळे आम्ही युवा खेळाडूंना अधिक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. 


वॉर्नरच नाही तर त्याच्यासोबत केदार जाधव शाहबाज नदीम देखील कदाचित यापुढील सामन्यांमध्ये खेळताना दिसणार नाहीत. अनेक युवा खेळाडू मैदानावर आलेच नाहीत. उर्वरित आयपीएलच्या सामन्यात आता त्यांना जास्त संधी देण्याचा निर्णय प्रशिक्षकांनी घेतला आहे. त्यामुळे आता दिग्गज खेळाडू मैदानात कदाचित पुन्हा दिसणार नाहीत असं चाहत्यांनाही वाटत आहे. 


वॉर्नर IPLमधून बाहेर पडणार असल्याचं समजताच चाहत्यांची मोठी निराशा झाली आहे. वॉर्नर्स आतापर्यंत IPL मध्ये 150 सामने खेळला आहे. त्याने एकूण 150 सामन्यात मिळून 5449 धावा केल्या आहेत. कोहली वॉर्नर्सच्या 202 धावा मागे आहे. वॉर्नर विराट आणि रोहितपेक्षा धावांच्या बाबतीत कायम पुढे राहिला आहे. त्याने तीनवेळा ऑरेंज कॅप देखील जिंकली आहे.