मुंबई : पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज (PBKS vs CSK) यांच्यात खेळल्या गेलेल्या आयपीएल 2021 (आयपीएल 2021) च्या 8 व्या सामन्यात शुक्रवारी एमएस धोनीच्या 'यलो आर्मी' ने विजय मिळवला आहे. एमएस धोनीची (MS Dhoni) टीम चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्जचा 6 गडी राखून पराभव करत आयपीएल 2021 मध्ये पहिला विजय मिळविला.


माहीने शाहरुखला टिप्स दिल्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामन्यानंतर एमएस धोनीने (MS Dhoni) पंजाब किंग्जचा बॅट्समॅन शाहरुख खानला (Shahrukh Khan) अनेक टिप्स दिल्या. महत्त्वाचे म्हणजे शाहरुखने या सामन्यात 47 रन्सचा महत्वाचा खेळ खेळला. त्याच्यामुळेच पंजाब किंग्जला 106 चा स्कोर करता आला. कारण पंजाब किंग्जमधील बाकी अनुभवी खेळाडू आपले योगदान देऊ शकले नाहीत.


माही तरुण खेळाडूंचा मार्गदर्शक


एमएस धोनीने (MS Dhoni) कोणत्याही युवा क्रिकेटरला टिप्स दिल्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून, आयपीएलमध्ये असे घडले आहे. जेव्हा एखादा युवा खेळाडू धोनीच्या विरोधी टीमकडून खेळतो आणि आपला चांगला खेळ दाखवतो तेव्हा, धोनी त्याला आपला अनमोल वेळ देतो.



फोटो व्हायरल


एमएस धोनी (MS Dhoni)आणि शाहरुख खान(Shahrukh Khan) यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यलो आर्मीच्या कॅप्टनच्या या भूमिकेचे चाहते अभिनंदन करत आहेत.