मुंबई: IPLच्या चौदाव्या हंगामातील दुसरा सामना आज होणार आहे.  चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना रंगणार आहे. 23 वर्षांच्या ऋषभ पंतकडे यावेळी दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व आहे. अनुभवी खेळाडू असलेल्या CSK संघाविरोधात युवा जोश असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा आज टिकाव लागणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स संघ आतापर्यंत 23 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी 15 सामने चेन्नई सुपरकिंग्स संघ जिंकला आहे. तर 8 सामने दिल्ली कॅपिटल्स संघ जिंकला आहे. आज गुरू धोनी आणि शिष्य ऋषभ पंत यांच्यात कडवी लढत होणार आहे.


इंग्लंड विरुद्ध टीम इंडियानं खेळलेल्या सामन्यांमध्ये ऋषभ पंतची कामगिरी खूपचं दिमाखदार होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीचा आणि अनुभवाचा फायदा दिल्ली कॅपिटल्स संघाला होणार आहे. इतकच नाही तर ऋषभ पंत स्लेजिंग करण्यात माहिर आहे. त्यामुळे या सामन्यात तो काय करणार हे पाहाणं सर्वांसाठी औत्सुक्याचं आहे. 


दिल्ली संघाचं मनोबल वाढवण्यासाठी श्रेयस अय्यरनं व्हिडीओ ट्वीट करून मेसेज दिला आहे. 'आपण खूप कठोर मेहनत घेतली आहे. प्रत्येक चेंडू आणि सामन्यात मी तुमच्यासोबत आहे.' कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरने उत्तम कामगिरी केली आहे. गेल्या हंगामात त्याने संघाला अंतिम फेरीपर्यंत नेलं होतं. अंतिम सामन्यात हा संघ मुंबई इंडियन्सकडून पराभूत झाला. चेन्नईची कमान महेंद्रसिंग धोनीकडे आहे. अशा परिस्थितीत पंत आणि धोनी यांच्यात चांगली झुंज पाहायला मिळणार आहे.