दुबई: आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने रंजक वळणावर येऊन ठेपले आहेत. पंजाब संघाने दुसऱ्या टप्प्यात आपली दमदार कामगिरी दाखवली आहे. त्यामुळे प्ले ऑफमध्ये जाण्याची आशा वाढली आहे. तर दुसरीकडे सुरुवातीपासून दमदार फॉर्ममध्ये खेळणाऱ्या चेन्नईला मात्र आजच्या पंजाब विरुद्धच्या सामन्यात गुडघे टेकण्याची वेळ आली. पंजाबच्या गोलंदाजांनी धोनीच्या संघाला धूळ चारली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या आयपीएलमध्ये के एल राहुलचा स्वॅग पुन्हा एकदा चाहत्यांना पाहायला मिळाला. चेन्नई विरुद्धच्या आजच्या सामन्यात राहुलने 98 धावा केल्या. शतक हुकलं आणि सर्वाधिक धावा करणारा खेळाडू तो ठरला आहे. याशिवाय के एल राहुलच्या नावावर एक अनोखा रेकॉर्डही या निमित्ताने झाला आहे. 


पंजाबचा सलामीवीर फलंदाज के एल राहुल IPL मध्ये पंजाब किंग्जसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. राहुलने 2018 पासून पंजाबसाठी 55 सामने खेळले आहेत. 55 सामन्यांमध्ये मिळून त्याने 2487 धावा केल्या आहेत. पंजाबने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध आयपीएल 2021 च्या 53 व्या सामन्यात ही कामगिरी केली. 


के एल राहुलने चेन्नईविरुद्ध अवघ्या 25 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं. राहुलची पंजाबसाठी नाबाद 132 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने पंजाबसाठी आतापर्यंत दोन शतके आणि 22 अर्धशतके देखील केली आहेत. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात राहुलला 2 धावांसाठी शतक हुकलं. राहुलने नाबाद 98 धावा केल्या. 



के एल राहुल शतकापासून केवळ 2 धावा दूर होता. नाहीतर IPLच्या यंदाच्या हंगामात त्याला शतक करण्यात मोठं यश आलं असतं. के एल राहूलने 42 बॉलमध्ये 98 धावा केल्या आहेत. मार्कडमने 8 बॉलमध्ये 13 तर मयंक अग्रवालने 12 बॉलमध्ये 12 धावा केल्या. चेन्नईकडून शार्दूल ठाकूरला तीन विकेट्स घेण्यात यश आलं. 


शाहरुख खान केवळ 8 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. चेन्नई संघाने पहिल्यांदा फलंदाजी करत 135 धावांचं लक्ष्य पंजाब संघासमोर ठेवलं. एवढं लक्ष्य़ पार करणं पंजाबला शक्य होईल की नाही असं चाहत्यांना वाटत होतं. मात्र दुसऱ्या टप्प्यात पंजाब पुन्हा दमदार फॉर्ममध्ये मैदानात उतरल्याचं दिसत आहे.