मुंबई: IPLच्या चौदाव्या हंगामातील 8 वा सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध पंजाब सोबत वानखेडे स्टेडियमवर होत आहे. कॅप्टन कूल धोनीला पहिल्या दिल्ली विरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. आता पंजाब संघाला पराभूत करून विजय कसा मिळवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सामना होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीने चेन्नईला पहिल्या सामन्यात 7 विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. तर दुसरीकडे पंजाब राजस्थान विरुद्घ जिंकला होता. आजच्या सामन्यात कोण वरचढ ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


आतापर्यंत झालेल्या IPLच्या सर्व सामन्यांचा विचार करायचा झाला तर चेन्नई विरुद्ध पंजाब आजवर म्हणजेच 2008 ते 2020 पर्यंत 23 सामने एकमेकांविरोधात खेळले आहेत. त्यापैकी 14 सामने जिंकण्यात चेन्नईला यश आलं आहे. 



पंजाब संघात एक बदल पाहायला मिळू शकतो.  मेरेडिथच्या जागी क्रिस जॉर्डनला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. 
चेन्नई सुपरकिंग्स संभाव्य प्लेइंग इलेवन
महेंद्र सिंह धोनी (कर्णधार) ऋतुराज गायकवाड, फाफ डू प्लेसिस, मोइन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, सॅम कुरेन, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकुर आणि दीपक चहर


पंजाब किंग्स संभाव्य प्लेइंग इलेवन
केएल राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, दीपक हुड्डा, निकोलस पूरण, शाहरुक खान, जाय रिचर्डसन, मुरुगन अश्विन, रॅली मेरेडिथ  मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंह