दुबई: विराट कोहलीचा संघ बंगळुरू विरुद्ध धोनीचा संघ चेन्नई आज आमनेसामने खेळणार आहेत. 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात आज कोणते बदल होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. दुसऱ्या सत्रामध्ये कोलकाता संघाकडून विराटच्या टीमला वाईट पराभवाचा सामना करावा लागला होता. बंगळुरू सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्ले ऑफच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी RCB टीमला हा सामना जिंकणे आवश्यक आहे. कोलकाताविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात फलंदाजांव्यतिरिक्त गोलंदाजांनीही विशेष चांगली कामगिरी केलेली दिसली नाही. अशा स्थितीत विराट चेन्नईविरुद्ध खेळणाऱ्या 11 मध्ये बदल करू शकतो. युएईच्या मैदानावर वेगवान गोलंदाजांना संधी जास्त दिली जाऊ शकते. विराट आयपीएलचा वेगवान भारतीय गोलंदाज नवदीप सैनीला आताच्या सामन्यात संधी देण्यात आली आहे.


28 वर्षीय सैनी वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. आयपीएल 2019 आणि 2020 मध्ये सैनी हा सर्वात वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याने IPL 2019 मध्ये 152.85 kmph च्या वेगाने चेंडू टाकला होता. आतापर्यंतच्या सामन्यात नवदीप सैनीने सर्वोत्तम ही कामगिरी केल्यानं त्याला पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. आता दुसऱ्या टप्प्यात तो कमाल करू शकतो असा विश्वास सर्वांनाच आहे.


सैनीने 27 आयपीएल सामन्यांमध्ये फक्त 17 विकेट्स घेतल्या आहेत. अलीकडेच श्रीलंका दौऱ्यावर सैनीला एक वनडे आणि एक टी -20 सामना खेळण्याची संधी मिळाली पण तो विकेट घेण्यात अपयशी ठरला. सैनी वेगाने बॉल टाकून फलंदाजांसमोर अडचणी निर्माण करू शकतो. त्यामुळे आता चेन्नईच्या फलंदाजांची दाणादाण उडवण्यासाठी सैनीला संघात संधी देण्यात आली आहे. सैनी आपल्या वेगवान फलंदाजीनं बंगळुरूला जिंकवणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.