मुंबई: चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघ आज वानखेडे स्टेडियमवर सामना होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना पार पडणार आहे. युवा कर्णधार संजू सॅमसन विरुद्ध कर्णधार महेंद्रसिंह धोनी आज खेळताना दिसणार आहेत. या सामन्यापूर्वी IPLच्या दोन टीममध्ये ट्विटरवॉर रंगल्याचं पाहायला मिळालं. या ट्विटरवॉरमध्ये अनेक चाहते देखील सहभागी झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थान रॉयल्स संघाने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रजनिकांत दिसत आहे. त्याने गुलाबी रंगाचा शर्ट घातला आहे. आजचा रंग असं कॅप्शन देऊन आम्ही जिंकणार या आविर्भावात राजस्थान रॉयल्सने ट्वीट केलं आहे. 


त्याच फोटोवर रिट्वीट करत चेन्नई संघाने रजनिकांत यांचा मागे पिवळ्या रंगाची धुळवड होत असलेला एक फोटो अपलोड केला आहे. दोन संघांमध्ये रंगलेलं हे ट्विटर वॉर पाहून चाहते देखील सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो पोस्ट करत आहेत. 








सोशल मीडियावर रंगलेल्या या वॉरमध्ये तर दोन्ही संघ आघाडीवर पाहायला मिळत आहेत. मात्र प्रत्यक्षात आजचा सामना मैदानात कोण जिंकणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. 


राजस्थान रॉयल्स संघाने आणखी एक सुंदर फोटो अपलोड केला आहे. या फोटोमध्ये कॅप्टनकूल धोनी टीव्हीवर खेळताना दिसत आहे. तर युवा राजस्थान रॉयल्सची टीम त्याला पाहात आहे. ज्या धोनीला इतके वर्ष खेळताना पाहिलं आज त्याच्यासोबत थेट मैदानात सामना खेळण्याची संधी आज मिळाली आहे असं या फोटोमधून राजस्थान रॉयल्स संघाला सांगायचं आहे. हा फोटो खूप बोलका आहे.


चेन्नई सुपरकिंग्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन


ऋतुराज गायकवाड/रॉबिन उथप्पा, फाफ डुप्लेसिस, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, सॅम करन, महेंद्र सिंह धोनी, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर, दीपक चहर


राजस्थान रॉयल्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन


 मनन वोहरा/यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन, शिवम दुबे, डेव्हिड मिलर, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, जयदेव उनादकट, चेतन साकरिया, मुस्तफिजुर रहमान