मुंबई: चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज वानखेडे स्टेडियमवर सामना रंगणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता आज राजस्थान संघाचा युवा कर्णधार संजू सॅमसन आणि चेन्नई संघाचा कॅप्टन कूल आमने-सामने भिडणार आहेत. दोन्ही संघांनी 2021च्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्याच्या पार्श्वभूमीवर राजस्थान रॉयल्स संघाच्य़ा ट्वीटवर एकचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये संघाचा कर्णधार संजू सॅमसननं जोस भाईचे आभार मानले आहेत. दिल्ली विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने जी मदत केल्या बद्दल संजू सॅमसननं त्याचे आभार मानताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे.




कोण आहे जोसभाई?


राजस्थान रॉयल्स संघातील जोस बटलर हा इंग्लंडमधील खेळाडू आहे. राजस्थान संघात तो समाविष्ट झाल्यानंतर त्याने संजूला दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात खूप मदत केली होती. त्यासाठी संजूनं त्याचे आभार मानत त्याला जोसभाई असं टोपणनाव दिलं आहे.


आजचा सामना अत्यंत चुरशीचा होणार असून कोण वरचढ ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दोन्ही संघातील संभाव्या प्लेइंग इलेव्हन कसे असतील जाणून घ्या


राजस्थान रॉयल्स संघ


मनन वोहरा/यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन, शिवम दुबे, डेव्हिड मिलर, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, जयदेव उनादकट, चेतन साकरिया, मुस्तफिजुर रहमान


चेन्नई सुपरकिंग्स संघ


ऋतुराज गायकवाड/रॉबिन उथप्पा, फाफ डुप्लेसिस, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, सॅम करन, महेंद्र सिंह धोनी, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर, दीपक चहर