मुंबई: IPL सामना सुरू होण्याआधी आता सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. सचिन तेंडुलकरनंतर आता दिल्ली कॅपिटल्स संघातील स्टार गोलंदाज कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. टीम इंडियाचा स्टार गोलंदाज आणि दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या अक्षर पटेलचा कोरोना रिपोर्ट IPLपूर्वी पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

9 एप्रिलपासून IPLचे सामने सुरू होत आहेत. या सामन्यांच्या 5 दिवस आधीच स्पिनर अक्षर पटेलचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. याआधी श्रेयस अय्यरला दुखापत झाल्यामुळे संपूर्ण IPL खेळू शकणार नाही. 



त्यामुळे दिल्ली कॅपिटल्ससाठी एक आधीच मोठा धक्का असताना आता अक्षर पटेलला कोरोना झाला आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्समधील स्टार खेळाडू पहिले IPLचे सामने खेळू शकणार नाही.


अर्थातच दिल्ली कॅपिटल्सची धुरा ऋषभ पंतच्या खांद्यावर असल्यानं त्याचं टेन्शन वाढलं आहे. संघातील स्टार खेळाडूची कमी भरून काढण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत. 


दुसरीकडे चेन्नई सुपरकिंग्सच्या टीममधील एकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. कन्टेन्ट टीममधील एकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे.