दुबई: प्ले ऑफमध्ये चेन्नईसोबत दिल्ली आणि बंगळुरू संघ पोहोचले आहेत. आता चौथा संघ कोणता पोहोचणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. आज दिल्ली विरुद्ध बंगळुरू आणि मुंबई विरुद्ध हैदराबाद असे दोन सामने होणार आहेत. मुंबई संघाला हा सामना जिंकणं खूप गरजेचं आहे. तरच प्ले ऑफमध्ये त्याला स्थान मिळू शकणार आहे. अन्यथा कोलकाता संघ प्ले ऑफमध्ये जाऊ शकतो. हे सगळं समीकरण आजच्या दोन सामन्यांवर असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्लेऑफमध्ये स्थान मिळवलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला पराभूत पुढच्या टप्प्यामध्ये स्थान निश्चित केलं. दिल्लीचे 13 सामन्यात 20 गुण आहेत आणि पहिल्या दोनमध्ये स्थान निश्चित केलं आहे. दुसरीकडे, बुधवारी सनरायझर्स हैदराबादच्या हातून झालेल्या पराभवानंतर आरसीबीला गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर राहणे कठीण झाले आहे. त्याचे 16 गुण आहेत आणि निव्वळ रन रेट दुसऱ्या स्थानावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्जपेक्षाही कमी आहे.



आता बंगळुरू संघाने जर दिल्लीचा पराभव केला तर नेटरनरेट वाढू शकतो. त्यामुळे दिल्लीचा पराभव करणं बंगळुरू संघासाठी महत्त्वाचं आहे. आज होणाऱ्या सामन्यात कोण विजयी ठरू शकतं हे पाहाणं महत्त्वाचं आहे. मात्र यापूर्वीचे हेड टू हेड अंदाज काय सांगतात जाणून घेऊया.


 


बंगळुरू विरुद्ध दिल्ली आतापर्यंत 27 सामने एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. आतापर्यंत 16 सामने बंगळुरू संघाने जिंकले आहेत. तर 10 सामने गमवले आहेत. तर दिल्ली संघाने 10 सामने जिंकले असून 16 सामने गमवले आहेत. तर बंगळुरू विरुद्ध दिल्ली एका सामन्याचा निर्णय लागला नाही.