मुंबई: बिर्याणीचं नुकतं नाव जरी काढलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. पण याच बिर्याणीचा आपल्या शरीरावर परिणाम होतोय हे लक्षात घेऊन सध्या एका खेळाडूनं ती न खाण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय त्याच्या पथ्थी पडला आणि त्याचा फायदा झाला. IPLची तयारी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्समधील एका खेळाडूनं बिर्याणी न खाण्याचा निश्चय केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IPL सुरू होण्यासाठी बोटावर मोजण्याइतकेही दिवस उरलेले नाहीत. सर्व संघांनी कंबर कसली आहे. याच IPLसाठी दिल्ली कॅपिटल्स संघातील एका खेळाडूनं चक्क बिर्याणी खाणं सोडून दिलं आहे. फिटनेससाठी त्यानं हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. 


दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज आवेश खाननं 14व्या IPL हंगामासाठी हा बिर्याणी सोडण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सनं याचा व्हिडीओ आपल्या ट्वीटरवर शेअर केला आहे. स्पिनर गोलंदाज अमित मिश्रा बिर्याणी खाताना आवेश खानला खूप मिस करत आहे. एकावेळी 2 किलो बिर्य़ाणी आवेश खायचा मात्र आता त्यानं बिर्याणी खाणंच बंद केल्याचं अमित मिश्रानं सांगितलं. 



2018च्या IPLमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून आवेश खेळला होता. त्यावेळी त्यानं आपली दमदार कामगिरी दाखवली होती. यंदाच्या हंगामात देखील दिल्ली कॅपिटल्सकडून तो खेळणार आहे.


दिल्ली कॅपिटल्स संघाच्या नेतृत्त्वाची कमान ऋषभ पंतच्या खांद्यावर देण्यात आली आहे. हाताच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर IPL खेळू शकणार नाही. 8 एप्रिल रोजी त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दिल्ली कॅपिटल्समधील सर्व खेळाडू श्रेयस अय्यरला खूप मिस करत आहेत.