मुंबई : कोरोनामुळे बीसीसीआयने आयपीएलचा 14 वा सत्र पुढे ढकलला आहे. कोरोनाने खेळाडूंसाठी तयार केलेल्या बायो-बबलमध्ये प्रवेश केला होता आणि बऱ्याच खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. यानंतर BCCI ने लगेचच लीग पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनेही आयपीएल 2021 बद्दल बर्‍याच गोष्टी सांगितल्या. गांगुली यांनी म्हटलं की, आयपीएलच्या 14 व्या मोसमाच्या उर्वरित सामने कधी होणार हे आताच सांगणे कठीण आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सौरव गांगुली म्हणाले की, 'आम्हाला मिळालेल्या अहवालानुसार बायो-बबल नियमांचे उल्लंघन झाले नाही आणि मला तसे वाटत नाही. बायो-बबलच्या आत कोरोना कसा आत गेला हे सांगणे फार कठीण आहे आणि देशात इतके लोकं कसे संक्रमित होत आहेत हे सांगणे देखील फार अवघड आहे. त्यावेळी कोविडची केवळ काही प्रकरणे नोंदवली जात असल्याने बीसीसीआयने भारताच्या अनेक शहरांमध्ये आयपीएलचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला होता.'


गांगुली म्हणाले की, आम्ही इंग्लंड दौरा बर्‍यापैकी यशस्वीरित्या पार पाडला होता आणि या हंगामात युएईमध्ये आयपीएल आयोजित करण्याची चर्चा होती, परंतु फेब्रुवारी महिन्यात भारतातील कोरोना प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाली होती, परंतु तीन आठवड्यांनंतरच त्यात मोठी वाढ झाली. यापूर्वी अशी प्रकरणे फार कमी होती आणि परिस्थिती नियंत्रणात होती. आम्ही मुंबईत सुरुवात केली आणि सामना कोणत्याही कोरोनाचा संसर्गा शिवाय संपला, त्यावेळी मुंबईत बरीच प्रकरणे समोर येत होती.'