IPL2021: ठरलं! RRसंघातील वेगवान गोलंदाजाची या दिवशी होणार सर्जरी
आयपीएल सामन्याआधी राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज काही सामने मैदानात खेळू शकणार नाही.
मुंबई: आयपीएल सामन्याआधी राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज काही सामने मैदानात खेळू शकणार नाही. या गोलंदाजाच्या जागी तीन विदेशी गोलंदाज तात्पुरते रिप्लेस केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. IPLचे पहिले काही सामने हा गोलंदाज खेळू शकणार नाही.
इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. त्या हातावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्यानं IPLचे पहिले काही सामने तो खेळू शकणार नाही. राजस्थान रॉयल्सकडून जोफ्रा आर्चर खेळणार होता. मात्र सध्या तरी तो प्लेइंग इलेवनमधून बाहेर असल्यानं राजस्थान रॉयल्स संघासाठी हा मोठा धक्का आहे.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर सर्जरी सोमवारी उजव्या हातावर शस्त्रक्रिया करणार आहे. जानेवारीत भारतात येण्यापूर्वी घराची साफसफाई करताना त्याच्या उजव्या हाताच्या कोपरात दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याने कसोटी मालिकेचे 2 सामने आणि टी -20 मालिकेतील पाचही सामने भारत विरुद्ध खेळले. यावेळी, ईसीबीची वैद्यकीय पथक त्याच्या दुखापतीवर नजर ठेवून होतं. पण टी -20 मालिकेदरम्यान त्याची अस्वस्थता वाढली होती. वन डे मालिकेतून त्याला आराम देण्यात आला.
25 वर्षीय वेगवान गोलंदाज इंग्लंडकडून 3 फॉरमॅटमध्ये 42 सामने खेळला आहे. त्यामध्ये एकूण 86 गडी आऊट केले. जोफ्रा आर्चर टी -20 लीग आयपीएलमध्ये 3 हंगाम गाजवले. मागील हंगामात त्याने 14 सामन्यांत 20 गडी बाद केले. या व्यतिरिक्त त्याने 2019 मध्ये 11 आणि 2018 मध्ये 15 गडी आऊट केलं आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्सचा तगडा खेळाडू सध्या मैदानात उतरू शकत नसल्यानं त्याची कमतरता आणि संघाला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.