मुंबई: मुंबई इंडियन्स विरुद्ध 9 विकेट्सने सामना जिंकल्यानंतर पंजाब किंग्स संघातील स्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या फिटनेसची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. त्याच्या फिटनेससोबतच त्याने आता एक मजेशीर व्हिडीओ देखील केला आहे. ख्रिस गेल सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असतो. त्याचं जमैका टू इंडिया गाणं देखील खूप लोकप्रिय झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ख्रिस गेलनं अमरीश पुरी यांच्या सिनेमातील प्रसिद्धा डायलॉग म्हणण्याचा प्रयत्न केला. पहिला प्रयत्न सपशेल अपयशी झाला आणि मैदानात हशा पिकला. मात्र पुन्हा एकदा ख्रिस गेलनं तो डायलॉग म्हणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा हा व्हिडीओ पंजाब किंग्स संघाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 



5 वेळा चॅम्पियनशिप असलेल्या मुंबई इंडियन्स संघाला पराभूत केल्यानंतर ख्रिस गेलनं आपली भावना व्यक्त केला. सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या दिवशी मैदानात व्यायाम करत असताना मोग्याम्बो खुश हुआ असं ख्रिस गेल म्हणण्याचा प्रयत्न करताना दिसला. 


IPL2021: 'जसप्रीत बुमराहपेक्षा गोलंदाजीत मोहम्मद सिराज श्रेष्ठ'


मयंक अग्रवाल, के एल राहुल आणि दिपक हुड्डा यांनी आपल्या तुफान फलंदाजीमुळे तर रिचडसन 2 विकेट्स अर्षदीप सिंगने कमालीची गोलंदाजी केल्यानं मुंबई इंडियन्स संघाला जास्त धावा करण्यात यश मिळालं नाही. याचा फायदा पंजाब संघाला झाला आणि मुंबई इंडिन्स संघाला पराभूत करत 9 विकेट्सने पंजाबने विजय मिळवला आहे. 


IPL 2021: Universe Boss ख्रिस गेलनं सांगितलं आपल्या फिटनेसचं रहस्य


26 एप्रिल रोजी पंजाब किंग्सचा सामना आता कोलकाता संघासोबत आहे. आतापर्यंत झालेल्या 5 सामन्यापैकी पंजाबला केवळ 2 सामने जिंकण्यात यश मिळालं आहे. तर कोलकाता संघ केवळ एक सामना जिंकला आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.