मुंबई: कोलकाता नाईट रायडर्स संघाने हैदराबादवर 10 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात हरभजनसिंगला एकच ओव्हर खेळायला दिल्यानं चाहत्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. मात्र असं करण्यामागे कोलकाता संघाचा कर्णधार इयोन मॉर्गननं खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

699 दिवसांनंतर IPLच्या मैदानात खेळण्यासाठी उतरलेल्या हरभजन सिंगला एकच ओव्हर का देण्यात आली यावर सोशल मीडियावर सध्या गदारोळ सुरू आहे. अनेक मीम्सही शेअर केले जात आहेत. रविवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने हरभजन सिंगला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामविष्ट करून घेतलं होतं.भज्जीला केवळ एकच ओव्हर टाकण्याची संधी मिळाली. भज्जीला एका पेक्षा अधिक ओव्हर का खेळू दिल्या नाहीत याबाबत KKRच्या कर्णधारानं खुलासा केला आहे. 




सामन्यानंतर मॉर्गन म्हणाला, "भज्जीने पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली सुरुवात केली आणि नंतर आम्ही गोलंदाजी करू शकलो नाही. हरभजनसिंगच्या अनुभवाचा आम्हाला पुरेपूर फायदा झाला. त्याच्या अनुभवाचा उपयोग इतर खेळाडूंना सल्ले देण्यासाठी झाला असंही मॉर्गनने स्पष्टीकरण दिलं आहे.


हरभजन सिंगने आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 8 धावा दिल्या. त्यात ऋध्दिमान साहाने एक षटकार ठोकला. मॉर्गनजवळ हरभजनसिंग व्यतिरिक्त शाकिब अल हसन आणि वरून चक्रवर्ती असे दोन स्पिनर्सचे पर्याय होते. तर प्रसिद्ध कृष्णा, पॅट कमिन्स, आंद्रे रसेल असे तीन वेगवान गोलंदाज होते. त्यामुळे हरभजनसिंगला गोलंदाजी करण्याची संधी कमी मिळाल्याचंही सांगितलं जात आहे.