IPL 2021 : Points Table वर या टीम टॉप वर, जाणून घ्या कोणाच्या नावावर Orange Cap आणि Purple Cap?
रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने प्रथम फलंदाजी करताना पाच विकेट्समध्ये 171 धावा केल्या आणि त्यानंतर बँगलोरने दिल्ली कॅपिटलसला 20 ओव्हरमध्ये चार विकेट्स घेऊन 170 धावांवर रोखले.
मुंबई : मंगळवारी झालेल्या आयपीएल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (RCB) दिल्ली कॅपिटल्सला (DC) एका धावाने पराभूत करून पॉइंट टेबलमध्ये प्रथम स्थान मिळविले आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने प्रथम फलंदाजी करताना पाच विकेट्समध्ये 171 धावा केल्या आणि त्यानंतर बँगलोरने दिल्ली कॅपिटलसला 20 ओव्हरमध्ये चार विकेट्स घेऊन 170 धावांवर रोखले.
बँगलोर टेबल टॉपर
रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (RCB) सहा सामन्यांमधील हा पाचवा विजय आहे आणि ते आता 10 गुणांसह पॅाईंट टेबलवर अव्वल स्थानी पोहोचला आहेत. दिल्लीला त्यांच्या सहा सामन्यात हा दुसरा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता आठ गुणांसह तो संघ पॅाईंट टेबलवर तिसर्या क्रमांकावर आहे.
दुसर्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्ज
पॅाईंट टेबलवर दुसर्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्ज आहे. तसा या संघाकडे अजून एक सामना बाकी आहे, जो ते बुधवारी खेळतील आणि तो सामना ते जिंकले तर ते, पुन्हा अव्वल स्थानी पोहोतील. चेन्नई पाठोपाठ मुंबई इंडियन्स आठ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
धवनजवळ ऑरेंज कॅप
सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दिल्ली कॅपिटलचा (DC) सलामीवीर शिखर धवन 265 धावांनी अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे त्याच्या नावावर ऑरेंज कॅप आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (RCB) ग्लेन मॅक्सवेल 223 धावांनी तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
हर्षल पटेल जवळ पर्पल कॅप
सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (RCB) वेगवान गोलंदाज हर्षल पटेल अव्वल स्थानावर आहे आणि त्यामुळे त्याच्या नावावर पर्पल कॅप आहे. या सीझनमध्ये हर्षलने आतापर्यंत 17 विकेट्स घेतले आहेत. त्यांच्यानंतर दिल्लीचा (DC) अवेश खान 12 बळी घेऊन दुसर्या स्थानावर आहे.