चेन्नई : आयपीएलचा 14 वा सीझन सध्या सुरू झाला आहे. आयपीएलचा हा सीझन तसा सुंदर फीमेल स्पोर्ट्स एँकरसाठी देखील ओळखला जात आहे. फेमस स्पोट्स एँकर मयंती लँगर (Mayanti Langer) सध्या सोशल मीडियावरती चर्चेचा विषय बनली आहे. मयंती लँगर तशी या सीझनमध्ये एँकरींग करताना दिसत नाही. परंतु तिने जे ट्वीट केले आहे त्यामुळे ती भलतीच चर्चेत आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मयंतीने मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) वर एक आपत्तिजन ट्वीट केले आहे. ज्यामुळे मुंबई इंडियन्स आणि रोहित चे चाहते तिला ट्रोल करत आहेत.



मयंती लँगरने रोहित शर्माची उडवली खिल्ली


या सीझनच्या पहिल्या मॅचमध्ये विराटच्या रॉयल चैलेंजर्स बँगलोरने मुंबई इंडियन्सला मात दिली. परंतु कोलकाता नाइट रायडर्स विरोधात झालेल्या मॅचमध्ये रोहित शर्माच्या धुरंधरांनी आपला खेळ दाखवला आणि ती मॅच आपल्या नावावर केली.


केकेआरचा अंतिम 27 बॉलमध्ये 30 धावांचा स्कोर होता, परंतु केकेआरचे रसेल आणि दिनेश कार्तिकसारखे अनुभवी खेळाडू टीमला जिंकून देण्यासाठी अपयशी ठरले. ज्यामुळे मुंबई इंडियन्स मॅचमध्ये परत आली आणि मॅच आपल्या नावे केली.


या मॅच दरम्यान मयंती लँगरने (Mayanti Langer)  रोहित शर्मा (Rohit Sharma)वर एक ट्वीट केले, त्या ट्वीटमुळे सोशल मीडियावर मयंती ट्रोल होऊ लागली. त्यानंतर मयंती ने ते ट्वीट डिलीट केले. तिने ट्वीटमध्ये लिहिले की, "जर मुंबईने 200 पेक्षा जास्त धावा केल्या, तर मला वडापाव पाहिजे. कारण आपल्याला हिटमॅनची इज्जत करणे गरजेचे आहे."


मयंतीच्या ट्वीटनंतर रोहित शर्माचे फॅन्स भडकले आणि मयंतीला ट्रोल करु लागले.