मुंबई: मुंबई इंडियन्स संघावर 6 विकेट्सनं विजय मिळवण्यात दिल्ली कॅपिटलला मोठं यश आलं आहे. तीन सामने जिंकून दिल्लीनं दुसऱ्या क्रमांकावर आपलं स्थान पॉइंट टेबलमध्ये निश्चित केलं आहे. दिल्ली संघातील पुन्हा दमदार डेब्यू केलेला बॉलर मलिंगाचा रेकॉर्ड मोडू शकतो.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्माच्या बॅटला शांत ठेवण्याचं काम दिल्ली संघाता बॉलर अमित मिश्रा याने केलं आहेत. त्याने 4 विकेट्स घेऊन दिल्लीला विजय मिळवून दिला. अमित शर्माच्या बॉलिंगसमोर रोहित शर्माची बॅटिंग जास्तवेळ टिकू शकली नाही. हे आज झालं असंही नाही तर गेल्या 7 वर्षांत असं झालं आहे.


रोहित शर्मा अमित मिश्रासमोर फारशी उत्तम कामगिरी करू शकलेला नाही. मुंबई विरुद्धच्या सामन्यात मिश्राने पुन्हा एकदा रोहितची विकेट घेतली. रोहितला सर्वाधिक वेळा आऊट करणारा अमित मिश्रा IPLमधील एकमेव गोलंदाज आहे. असं जवळपास 7 वेळा झाल्याचंही सांगितलं जातं. 


अमित मिश्राने आयपीएलमध्ये हॅट्रिक घेतली आहे. IPLच्या इतिहासात दुसरा यशस्वी गोलंदाज म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं जातं. त्याने 152 सामन्यांत आतापर्यंत 164 विकेट्स घेतल्या आहेत. तर मलिंगाचा विक्रम मोडण्यासाठी या बॉलरला अवघ्या 7 विकेट्सची गरज आहे. मलिंगाने 2009-2019 या कालावधीत IPLमध्ये 122 सामने खेळून 170 विकेट्स घेतल्या होत्या.