नवी दिल्ली : आयपीएल 2021 च्या 5 व्या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला आहे. बॉलर्सने मुंबई इंडियन्सच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकाता नाईट रायडर्सला 20 ओव्हरमध्ये 122 धावाच करता आल्या. मुंबईने हा सामना 10 धावांनी जिंकला. नितीश राणाने सर्वाधिक 57 धावांची खेळी केली, पण राहुल चहरने केकेआरच्या 4 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले आणि त्यामुळे मुंबईला विजय मिळवणे सोपे झाले.


153 धावांचे लक्ष्य


मुंबई इंडियन्सने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 10 गडी गमावून 152 धावा केल्या. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 56 धावा केल्या तर रोहित शर्माचं अर्धशतक हुकलं. त्याने 32 चेंडूत 43 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त या संघाचा एकही फलंदाज मोठा डाव खेळू शकला नाही.


मुंबई इंडियन्सविरूद्धच्या या सामन्यात आंद्रे रसेलने 2 ओव्हरमध्ये 5 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. त्याने 7.50 च्या इकॉनॉमी रेटने 15 धावा दिल्या. मुंबई विरुद्ध 5 विकेट घेणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. याच मोसमातील सलामीच्या सामन्यात आरसीबीच्या हर्षल पटेलने असा करिश्मा केला.