मुंबई: मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात पंजाब संघाने 9 विकेट्सनं दणदणीत विजय मिळवला आहे. एकतर्फी मिळालेल्या या विजयानं मुंबई इंडियन्सचा धुव्वा उडवला आहे. चेपॉक स्टेडियमवर के एल राहुल आणि ख्रिस गेलनं केलेल्या विस्फोटक खेळीमुळे पंजाब किंग्स संघाला मोठा विजय मिळाला. पॉइंट टेबलवर या संघानं 5 वे स्थान मिळवलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यादरम्यान एक घटना समोर आली. त्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी मुंबई टीममधील फलंदाजाला खूप ट्रोल केलं आहे. मुंबई संघाची फलंदाजी सुरू असताना मोहम्मद शमी बॉलिंग करत होता. त्यावेळी किरोन पोलार्ड बॉल टाकण्याआधीच रन काढण्यासाठी क्रिझवरून जात असल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. 





हा फोटो व्हायरल झाल्यानंतर पंजाब किंग्सच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. एक युझर म्हणतो की किरोन पोलार्डला आऊट करण्याची आयती संधी होती. इतकंच नाही तर दुसरा युझर म्हणतो की त्याला वॉर्निंग न देताच सोडून दिलं. 


'मांकडिंग'वरून सोशळ मीाडियावर वाद


मुंबई इंडियन्सचा फलंदाज किरोन पोलार्डने केलेल्या या गोष्टीमुळे पुन्हा एकदा 'मांकडिंग' च्या चर्चेला उधाण आले आहे. व्यंकटेश प्रसाद यांनी काही दिवसांपूर्वी अशा परिस्थितीत आली आणि जर गोलंदाजानं आऊट केलं तर त्यासाठी त्यांनी समर्थनही दर्शवलं होतं. आता बर्‍याच क्रिकेट चाहत्यांनाही पोलार्डवर संताप व्यक्त केला आहे. 


के एल राहुलने 60 तर मयंक अग्रवालनं 25 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या ख्रिस गेलनं स्फोटकी खेळी केली. 35 चेंडूमध्ये त्याने 43 धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. मयंक अग्रवाल कॅच आऊट झाल्यानं केवळ 25 धावा काढून तंबूत परतला.  पंजाबच्या टीमने मुंबईच्या संघावर 9 विकेट्सनं दणदणीत विजय मिळवला आहे.