IPL 2021 : मुंबई इंडीयन्स विरुद्ध या खेळाडूने मारला जोरदार सिक्स आणि फोडला फ्रीज
सनरायझर्स हैदराबादची या सीझनमधील 3री मॅच होती. परंतु अजुनही सनरायझर्स हैदराबादला विजयाचा हिरवा झेंडा हाती लागलेला नाही.
चेन्नई : आयपीएलच्या 14 व्या सीझनची सुरवात झाली आहे. शनिवारी चेन्नई, येथे खेळण्यात आलेली मॅच सनरायझर्स हैदराबादची या सीझनमधील 3री मॅच होती. परंतु अजुनही सनरायझर्स हैदराबादला विजयाचा हिरवा झेंडा हाती लागलेला नाही. टी नटराजनला झालेल्या दुखापतीमुळे सनरायझर्स हैदराबादने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 4 बदल केले. तरीही सनरायझर्स हैदराबादला याचा काही फायदा झाला नाही.
प्रथम टॅास जिंकूण मुंबई इंडीयन्सने बॅाटिंग केली आणि 151 धावांचं लक्ष सनरायझर्स हैदराबाद समोर ठेवलं आहे. सुरवातीला हैदराबादच्या फलंदाजांनी शानदार सुरुवात केली. जॉनी बेस्टो आणि डेव्हिड वॉर्नर यांनी जोरदार फटके मारायला सुरवात केली आणि त्या दोघांनी मिळून केवळ 7 ओव्हरमध्ये 67 धावा केल्या. त्यावेळेला ही मॅच सनरायझर्स हैदराबादच्या हातात होती. परंतु नंतर मुंबई इंडीयन्सने ही मॅच जिंकली.
हैदराबादची बॅटिंग सुरु झाली, तेव्हा जॉनी बेस्टो आणि डेव्हिड वॉर्नरने जे काही फटके बाजी सुरू केली की, आता ही मॅच हे दोघेच काढणार की, काय असे वाटत होते. हे दोघे ज्या पद्धतीने बॅटिंग करत होते जसे, ते या स्टेडीयमचा प्रत्येक कानाकोपरा ओळखून आहेत. या मॅच दरम्यान जॉनी बेस्टोच्या बॅटने एक कमाल केली. ती म्हाणजे त्याने त्याच्या सिक्सने चक्कं कोल्ड्रिंक्स आणि पाणी ठेवलेल्या फ्रीजची काच फोडली. यानंतर बेस्टोचा हा सिक्स खूप व्हायरल झाला. लोकं त्याला वेगवेगळ्या प्रकारे कमेंन्ट्स देऊ लागले.
मुंबई इंडीयन्समधील बोल्टच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये बेस्टोने 3 चौके मारले आणि एक शानदार सिक्स ठोकला. त्याने केवळ 29 बॅालमध्ये आपलं अर्धशतक स्कोअर बोर्डवर लावलं.
बेअरस्टोचा आक्रमक अंदाज पाहून तो 15 व्या ओव्हरपर्यंत हैदराबादला जिंकवू शकेल, असं वाटत होते. मात्र बेअरस्टोचा खेळ व्यर्थ गेला. हा मॅच शेवच्या ओव्हर परंयंत खेळली गेली आणि 19.4 ओव्हर्समध्ये हैदराबादचे सगळेच खेळाडू 137 धावांवर ऑलआऊट झाले. मुंबईने हा सामना 13 रन्सने जिंकला.