मुंबई : आयपीएलमधील रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने (CSK) रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला (RCB) 69 धावांनी पराभूत करून पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान गाठले आहे. या सामन्यात सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी (Ms Dhoni) अनेकदा स्टम्पच्या मागून आपल्या गोलंदाजांना सल्ला देताना दिसला.


स्टंप माइकमध्ये धोनीचा आवाज


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनी (Ms Dhoni) अनेकदा आपल्या गोलंदाजांना सल्ला देत असतो, विशेषत रविवारच्या सामन्यात स्टार खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि धोनीने मिळून आरसीबीच्या फलंदाजांना खूप त्रास दिला आहे. खरं तर सामन्याच्या 11 व्या ओव्हरमध्ये जडेजाने एबी डिव्हिलियर्सची विकेट घेऊन त्याला ड्रेसिंगरुममध्ये परत पाठवले. त्यानंतर हर्षल पटेल मैदानावर फलंदाजी करण्यासाठी आला. हर्षल मैदानावर येताच धोनी जडेजाला म्हणाला, "मी यापुढे हिंदीत बोलू शकत नाही." स्टम्प माइकमध्ये धोनीचा आवाज रेकॅार्ड झाला. मैदानात उपस्थित असलेले सुरेश रैना आणि जडेजा धोनीचे हे शब्द ऐकल्यानंतर हसायला लागले.


धोनी असे का म्हणाला?


धोनीने हे जडेजाला म्हटले कारण, याआधी ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स मैदानावर होते. तेव्हा धोनी जडेजाला हिंदीमध्ये प्लॅन समजावत होता. धोनी हिंदीमध्ये बोलत होता कारण, परदेशी खेळाडूंना हिंदी येत नाही. पण हर्षल मैदानावर येताच धोनीने हिंदी भाषेत बोलण्यास नकार दिला कारण तो भारतीय खेळाडू आहे आणि त्याला या दोघांचा प्लॅन समजु शकतो.


जडेजाने अप्रतिम प्रदर्शन केले


या सामन्यात रवींद्र जडेजाने वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स यांची विकेट घेतली. जडेजाने सुरुवातीला 28 चेंडूत चार चौके आणि पाच स्किक्सच्या मदतीने नाबाद 62 धावा फटकावल्या, टी -20 मधील त्याची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. हर्षल पटेलने केलेल्या शेवटच्या ओव्हरमध्ये जडेजाने सर्वात जास्त सिक्स ठोकले आणि आरसीबी समोर मोठी धावसंख्या उभी केली. त्यामुळे आरसीबीला त्या धावसंख्येचा पाठलाग करणे कठीण झाले, त्यामुळे सीएसकेने हा सामना जिंकला.