चेन्नई : आयपीएल 2021 मधे चेन्नईच्या स्टेडीयमवर झालेल्या मुंबई इंडीयन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबादमधील मॅचमध्ये, मुंबई इंडीयन्सने सलग दुसरी मॅच आपल्या नावे केली. प्रथम टॅास जिंकूण मुंबई इंडीयन्सने बॅाटिंग केली आणि 150 धावांचं लक्ष सनरायझर्स हैदराबाद समोर ठेवलं आहे. सुरवातीला  हैदराबादच्या फलंदाजांनी शानदार सुरुवात केली. जॉनी बेस्टो आणि डेव्हिड वॉर्नर यांनी आपला शो सुरू केला. त्या दोघांनी मिळून केवळ 7 ओव्हरमध्ये 67 धावा केल्या. त्यावेळेला ही मॅच सनरायझर्स हैदराबादच्या पदरात होती. परंतु डेव्हिड वॉर्नर रन आऊट झाल्यानंतर सनरायझर्स हैदराबादच्या सगळ्या आशा संपल्या. आणि ही मॅच मुंबई इंडीयन्सच्या नावावार झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरेतर मुंबई इंडीयन्समधील बॅट्समॅननेही फारशी चांगली कामगिरी केली नाही. ही मॅच फक्त बॅालर्सच्या शानदार खेळामुळेच मुंबई जिंकू शकली. परंतु बॅटिंगमध्ये पोलार्डने 22 चेंडूत नाबाद 35 धावा करून संघाला चांगली धावसंख्या मिळवून देण्यास मदत केली. ज्यामुळे पोलार्डला 'मॅन ऑफ द मॅच' मिळाला. मॅचमध्ये 17 व्या ओव्हरमध्ये मुजीब रहमानच्या पहिल्याच बॅालवर पोलार्डने सगळ्यात लांब सिक्स मारला.



या सिक्सची लांबी 105 मीटर इतकी होती. आयपीएल 2021 च्या सीझमधील हा सर्वांत लांब सिक्स ठरला आहे. या सीझनमधील लांब सिक्स मारण्याचा विक्रम बँगलोरच्या ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर होता. त्याने मुंबईविरुद्ध 100 मीटर सिक्स मारला होता. आता त्याचा हा रेकॅार्ड मुंबईच्या पोलार्डने मोडला आहे.


संघ सुधारण्याची गरज


पोलार्ड मॅचनंतर प्रेजेनटेशनमध्ये म्हणाला की, "संघाला शेवटच्या ओव्हरमध्ये अधिक धावा करण्याचा मार्ग शोधावा लागेल. आज मी काही अतिरिक्त धावा गोळा केल्या ज्यामुळे संघाला मदत झाली. अशा पीचवर, जर तुमच्याकडे खेळायला कमी बॉल असतील तर, अशा परिस्थितीत रन्स करणे कठीण होते. परंतु आम्ही अशा परिस्थितीमध्ये खेळण्याचा सराव करतो. अशाप्रकारच्या विजयामुळे आत्मविश्वास वाढतो आणि मला माझे काम केल्याबद्दल आनंद आहे."