मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) दुसऱ्या टप्प्याची रविवार 19 सप्टेंबरपासून शानदार सुरुवात झाली. या दुसऱ्या टप्प्याचं आयोजन हे यूएईत (IPL 2021 UAE) करण्यात आलंय. स्टेडियममध्ये परवानगी असल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. क्रिकेट चाहते आपल्या टीमला चिअरअप करत आहे. एका बाजूला क्रिकेट चाहते मैदानात तसेच लाईव्ह सामन्याचा थरार अनुभवत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तानच्या (Afganistan IPL) नागरिकांना आपल्या स्टार खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळताना पाहायला मिळणार नाहीये. (ipl 2021 not broadcasting in afghanistan due to non islamic content)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलमध्ये अफगाणिस्तानचे एकूण 3 खेळाडू हे वेगवेगळ्या टीमसाठी खेळतात. यामध्ये फिरकीपटू राशिद खान, मोहम्मद नबी आणि हझरतुल्लाह जझाईचा समावेश आहे. हे तिघांमध्ये सामना एकहाती फिरवण्याची क्षमता आहे. मात्र या 3 सुपूत्रांची कामगिरी ही अफगाणिस्तानातील क्रिकेट प्रेमींनी पाहता येणार नाहीये. 


तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानात ताबा मिळवल्यानंतर तिथे सत्तास्थापनही झालीये. त्यामुळे आता तालिबानी सांगतिल ती पूर्व दिशा असेल. या तालिबान्यांनी आयपीएलबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. अफगाणिस्तानात आयपीएलचं प्रसारण न करण्याचा निर्णय तालिबान्यांनी घेतला आहे. 


नक्की कारण काय?


आयपीएलमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे इस्लाम मूल्यांचं उल्लंघन होतं. त्यामुळे अफगाणिस्तानात आयपीएल न दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


सामन्यादरम्यान प्रेक्षकांना आणि खेळाडूंना चिअरअप करण्यासाठी चीयरगर्ल्स असतात. याशिवाय सामना पाहण्यासाठी महिला येतात. त्यांचा चेहरा झाकलेला नसतो. या सर्व बाबी इस्लाम मूल्याचं उल्लंघन करणाऱ्या आहेत. यामुळे कोणताही चुकीचा संदेश जाऊ नये, याची खबरदारी घेतली जात आहे. या वृत्ताला अफगाणिस्तानचे वरिष्ठ पत्रकार यांनी दुजोरा दिलाय.त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय टीव्ही आणि रेडीओवर आयपीएलच्या सामन्यांचं प्रक्षेपण होणार नाही.