मुंबई: जमैका टू इंडिया गाणंच नाही तर जगभरात युनिव्हर्स बॉस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलनं अत्यंत लाजीरवाणा रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवला आहे. नुकत्याच झालेल्या कोलकाता विरुद्ध झालेल्या सामन्यात पंजाब संघाला 5 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासोबत गेलनंही एक वाईट रेकॉर्ड आपल्या नावे करून घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाब किंग्जकडून खेळणारा ख्रिस गेल कोलकाता नाईट रायडर्सविरूद्धच्या या सामन्यात शून्य धावांवर आऊट झाला. गेलला शिवम मावीने आऊट केलं. गेल टी 20 क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वात जास्त वेळा शून्यवर आऊट होण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.


ख्रिस गेल आता टी -20 मध्ये सर्वाधिक 29 वेळा शून्यवर आऊट झालेला फलंदाज ठरला आहे. ख्रिस गेलने या रेकॉर्डमध्ये चक्क ड्वेन स्मिथलाही मागे टाकत हा विक्रम केला आहे. ड्वेन स्मिथ टी -20 क्रिकेटमध्ये 28 वेळा शून्यावर बाद झाला आहे. 


ख्रिस गेलचे टी -20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा, सर्वाधिक षटकार, सर्वाधिक चौकार, सर्वाधिक शतक, वेगवान शतक असे अनेक विक्रम आपल्या नावावर असताना आता हा लाजीरवाणा रेकॉर्डमध्ये देखील त्याचं नाव आलं आहे. 


मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात के एल राहुल आणि गेलनं मिळून मुंबई संघाला 9 विकेट्सने पराभूत केलं होतं. मात्र कोलकाता विरुद्ध झालेल्या सामन्यात गेल फेल गेला. कोलकाता विरुद्ध झालेल्या सामन्यात 5 विकेट्सने विजय मिळवला आहे.