मुंबई: पंजाब किंग्स विरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स टीमला मोठ्या दारूण पराभव हाती आला. के एल राहुल आणि ख्रिस गेलच्या तुफानी फलंदाजीनं पंजाब संघाला 9 विकेट्सनं विजय मिळाला तर मुंबई इंडियन्स संघाला पराभव स्वीकारावा लागला आहे. पॉइंट टेबलमध्ये पंजाब संघाला 5वं स्थान मिळालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पीचवर धावा करणं थोडं आव्हानात्मक होतं. साधारण 150-160 स्कोअर असता तर सामन्यावर आपला कब्जा कायम राहातो. पण मागचे दोन सामने मुंबई इंडियन्स संघ ते करण्यात काहीसा अपयशी ठरला असल्याचं कर्णधार हिटमॅन रोहित शर्माने सांगितलं आहे. 


'ईशान किशन बॉलला चांगला मारण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला अपेक्षित यश मिळालं नाही. माझ्या बाबतीतही असंच घडलं. मागील सामन्यांमध्ये आम्ही पॉवरप्लेमध्ये चांगल्या धावा केल्या. पण आज आम्हाला यश मिळवता आलं नाही. '


रोहित शर्मानं पराभवाचं कारण, व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा


'आमच्या फलंदाजीत काही कमतरता होती. आम्हाला ज्या पद्धतीने खेळायचे होते, आम्ही 20 ओव्हरमध्ये खेळू शकलो नाही. आम्हाला मधल्या ओव्हरमध्ये तुफान खेळणाऱ्या फलंदाजाची गरज आहे. कारण चेपॉकसारख्या आव्हानात्मक खेळपट्टीवर स्वत:ला अजून तयार करायला हवं आहे.  त्या उणीवा भरून काढण्याचा प्रयत्न करू असंही यावेळी रोहित शर्मा म्हणाला आहे. 


मुंबई संघात डिकॉकने 3 तर रोहितने 63 धावा केल्या. ईशान किशन अवघ्या 6 धावा काढून तंबुत परतला. सूर्यकुमार यादव 33 तर पोलार्डने 16 धावा केल्या आहेत. हार्दिकने 1 आणि कृणालने 3 धावा केल्या. एकूणच मुंबई संघाने केलेल्या धावा यावेळी निराशाजनक होत्या. पुढच्या सामन्यासाठी पुन्हा एकदा मुंबई संघ या चुका कशा पद्धतीनं सुधारतो ते पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.