मुंबई: देशात कोरोनामुळे IPL तात्पुरतं स्थगित केलं असून खेळाडूंना आपल्या घरी जाण्याच्या सूचना BCCIने दिल्या आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना भारतातून ऑस्ट्रेलियामध्ये जाण्याची परवानगी नसल्याने मालदीवमार्गे जाणार होते. मालदीवमध्ये 14 दिवस क्वारंटाइन राहिल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आज आपल्या देशात परतणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाचे सर्व खेळाडू आज आपल्या देशात पोहोचणार खरे मात्र त्यांना थेट घरी जाता येणार नाही. त्यांना हॉटेलमध्ये 10 दिवस क्वारंटाइन राहावं लागणार आहे. त्यानंतर खेळाडू आपल्या घरी जाऊ शकणार आहेत. 


या ऑफ स्पिनरने जे केलं ते पाहून व्हाल हैराण! एकाच सामन्यात घेतले 9 विकेट्स


आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडू, कोच हे IPL स्थगित झाल्यानंतर मालदीवमध्ये क्वारंटाइन होते. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकेल हसीही दोहामार्गे रविवारी आपल्या देशात रवाना झाला. या स्पर्धेत 60 पैकी 29 सामने झाले आहेत. आणखी 31 सामने होणं अद्याप बाकी आहे. 


38 ऑस्ट्रेलियाई आता मालदीववरून आपल्या देशात पोहोचतील. त्यानंतर तिथे 10 दिवस क्वारंटाइन राहावं लागले, सिडनी इथे सर्वजण क्वारंटाइन होतील आणि त्यानंतर आपल्या घरी जाऊ शकणार आहेत.