Prithvi Shaw च्या चर्चित गर्लफ्रेडने दिला Suitcase खरेदी करण्याचा सल्ला
पुन्हा एकदा प्राची सिंहच्या नावाची चर्चा
मुंबई : कोलकाता नाइटरायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स (KKR vs DC) यांच्यात आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ने आपल्या तुफान खेळामुळे सगळ्या चाहत्यांच लक्ष वेधलं आहे. तसेच चर्चेत असलेली गर्लफ्रेंड प्राची सिंह (Prachi Sing) याचं देखील मन जिंकलं आहे.
पृथ्वीने गाठलं 82 धावांच लक्ष
दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) चा ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ने कोलकाता नाइटराइडर्स (Kolkata Knight Riders) विरूद्ध फक्त 41 चेंडूत 82 धावा केल्या आहेत. या दरम्यान 11 छक्के आणि 3 चौकार लगावले आहेत. पृथ्वीचा स्ट्राइक रेट हा 200 राहिला आहे.
प्राचीने दिला सूटकेस खरेदी करण्याचा निर्णय
पृथ्वी शॉ (Prithvi Shaw)ची चर्चेत असलेली गर्लफ्रेंड प्राची सिंह पृथ्वीच्या उत्तम खेळाचा आनंद व्यक्त करत आहेत. तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर पृथ्वीचा फोटो शेअर केला आहे. मला तुझ्यावर गर्व आहे. सोबतच तिने हार्ट इमोजी शेअर केला आहे. यासोबतच प्राचीने खूप सारे अवॉर्ड असलेला फोटो देखील शेअर केला आहे. प्राचीने लिहिलं आहे की,'एन नवीन सुटकेस ज्यामध्ये सगळे लोकं सामावले जातील.'
पृथ्वी शॉवर अवॉर्डची बरसात
पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ला चांगल्या खेळाकरता अवॉर्ड मिळालं आहे. '(Most Valuable Asset of the Match), 'पावर प्लेयर ऑफ द मैच' (Power Player of the Match), 'गेम चेंज ऑफ द मैच' (Game Changer of the Match), 'सुपर स्ट्राइकर ऑफ द मैच' (Super Striker of the Match) आणि 'मैन ऑफ द मैच' (Man of the Match) मध्ये सहभागी झाला आहे.