मुंबईः पंजाब किंग्जचा फलंदाज दीपक हूड्डाने राजस्थान रॉयल्स विरुद्ध तुफानी खेळी खेळली. सोमवारी त्याने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर छक्क्यांचा पाऊस पाडला. 28 चेंडूत 64 धावा करणाऱ्या दीपक हूडाने आपल्या बॅटीने 6 छक्के ठोकले. याशिवाय त्याने 4 चौके देखील मारले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हूडाने अवघ्या 20 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलमधील हे दुसरे वेगवान अर्धशतक आहे, जे एका बिनधास्त खेळाडूने पूर्ण केले आहे. याआधी मुंबई इंडियन्सच्या ईशान किशनने 2018 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 17 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते.


दीपक हूडाने कर्णधार केएल राहुलबरोबर तिसर्‍या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी केली. सामन्यात राहुलने 50 चेंडूंत 91 धावा केल्या आहेत. दोघांच्या अर्धशतकामुळे पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सला 222 धावांचे लक्ष्य दिले.


हुडाची किंमत 50 लाख


दीपक हूडाला पंजाब किंग्जने 2020 च्या लिलावात 50 लाख रुपयांत विकत घेतले होते. त्याने मागील सीझनमध्ये 7 सामने खेळले आणि 101 धावा केल्या आहेत. 62 धावांचा त्याचा बेस्ट स्कोर होता. हुडाने या आधी 1 अर्धशतक झळकावले होते. त्याने आयपीएलमध्ये एकूण 69 सामने खेळले आहेत. हूडा 18.13 च्या सरासरीने 689 धावा केल्या आहेत. एवढेच काय तर आयपीएलमध्ये हूडाने 7 विकेट्स देखील घेतले आहेत.


22 चेंन्डूत अर्धशतक


दीपक हुड्डाने यापूर्वी आयपीएलमध्ये 22 चेंडूंमध्ये 50 धावा काढल्या आहेत. 2015 च्या सीझनमध्ये दीपक हूडाने दिल्लीविरुद्ध 22 चेंडूत अर्धशतक झळकावले आहे.
राजस्थानविरुद्ध वेगवान अर्धशतक ठोकण्याच्या बाबतीत दीपक हूडाने हार्दिक पांड्या आणि वीरेंद्र सेहवागची बरोबरी केली आहे. या तीन खेळाडूंनी आती राजस्थानविरुद्ध 20 चेंडूत 50 धावा केल्या आहेत. राजस्थान विरुद्ध वेगवान अर्धशतकाचा विक्रम डेव्हिड मिलरच्या नावावर आहे. 2014 च्या सीझनमध्ये त्याने 19 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आहे.