यूएई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील पहिल्या क्वालिफायर 1 सामन्यात  (IPL 2021 Qualifier 1) चेन्नई सपुर किंग्सने (Chennai super kings) दिल्ली कॅपिट्ल्सवर (Delhi capitals) 4 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. दिल्लीने चेन्नईला विजयासाठी 173 धावांचे आव्हान दिले होते. चेन्नईने हे विजयी आव्हान 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. (IPL 2021 Qualifier 1 dc vs csk Chennai super kings beats Delhi capitals by 4 wickets at dubai international cricket stadium) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईकडून सलामीवीर ऋतुराज गायकवाडने 70 धावांची शानदार खेळी केली. तर रॉबिन उथप्पाने 63 रन्स चोपल्या. मोईन अलीने 16 धावांची छोटेखानी पण महत्त्वाची खेळी केली. तर धोनी आणि  रवींद्र जाडेजा यो जोडीने चेन्नईला विजयापर्यंत पोहचवलं. धोनीने नाबाद 18 धावा केल्या. तर जाडेजाने त्याला साथ दिली. 


चेन्नईची 9 वी वेळ 


या विजयासह चेन्नईने अंतिम फेरीत धडक मारली. चेन्नईची आयपीएलच्या इतिहासातील अंतिम फेरीत पोहचण्याची नववी वेळ ठरली. दरम्यान आता उद्या (11 ऑक्टोबर) बंगळुरु विरुद्ध कोलकाता यांच्यात एलिमेनेटर सामना खेळवण्यात येणार आहे.    


दोन्ही संघांचे अंतिम 11 खेळाडू


दिल्ली कॅपिट्ल्स :  शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (कर्णधार),  टॉम करन, शिमरॉन हेटमायर, अक्षर पटेल, आर अश्विन, खगिसो रबाडा, आवेश खान आणि एनरिच नॉर्तजे.  


चेन्नई :  ऋतुराज गायकवाड, फॅफ डु प्लेसिस, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, एमएस धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जाडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर आणि जोश हेझलवूड