DC vs KKR Qualifier 2 | रिषभ पंतची भर मैदानात अंपायरसोबत मस्ती, पाहा व्हीडिओ
आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) दुसरा क्वालिफायर सामना (DC vs KKR Qualifier 2) दिल्ली विरुद्ध कोलकाता यांच्यात खेळवण्यात येत आहे.
शारजा : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) दुसरा क्वालिफायर सामना (DC vs KKR Qualifier 2) दिल्ली विरुद्ध कोलकाता यांच्यात खेळवण्यात येत आहे. कोलकाताने टॉस जिंकून प्रतिस्पर्धी दिल्लीला बॅटिंगसाठी भाग पाडले आहे. दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतचा (Rishabh Pant) मस्तीखोरपणा प्रत्येक क्रिकेट चाहत्याला माहिती आहे. पंतचा कॉमेडी अंदाज चाहत्यांना पुन्हा पाहायला मिळाला आहे. (ipl 2021 qualifier 2 dc vs kkr Rishabh Pant having fun with umpire Anil Chaudhary before match see video)
पंतने यावेळेस खेळाडूसोबत नाही, तर चक्क अंपायरची भर मैदानात फिरकी घेतली आहे. या सर्व मस्तीचा व्हीडिओ व्हारयरल होतोय.
पंतने नक्की काय केलं?
हा सर्व प्रकार या सामन्याआधीचा आहे. या व्हीडिओत दिल्लीचा अनुभवी फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विन बॉल चेक करत होता. तर अंपायर अनिल चौधरी (umpire anil chaudhary) बॉलचा बॉक्स घेऊन उभे होते. त्यावेळेस पंत अंपायर चौधरीच्या मागून येतो.
त्यांच्या कंबरेच्या वरच्या भागात हात लावतो. आपल्याला नक्की कोणी हात लावला हे पाहण्यासाठी चौधरींनी मागे वळून पाहिलं. तितक्यात पंत त्यांच्या पुढे येऊन उभा राहतो. हा अवघ्या काही सेकंदांचा व्हीडिओ चाहत्यांना आवडला आहे.
दरम्यान पंतची ही फिरकी घेण्याची सवय काही आत्ताची नाही. त्याने याआधी मुंबई विरुद्धच्या सामन्यात नाणेफेकीच्या वेळेस कर्णधार रोहित शर्माच्या पोटाला बोटं लावली होती. तसेच पंतची स्टंपमागील कॉमेंट्रीही भन्नाट असते.
दरम्यान या क्वालिफायर 2 च्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये अंतिम फेरीत पोहचण्यासाठी कडवी झुंज पाहायला मिळतेय. त्यामुळे या सामन्यात कोण जिंकणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
दिल्ली कॅपिटल्स Playing XI : शिखर धवन, पृथ्वी शॉ, रिषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर) , श्रेयस अय्यर, शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टोइनिस, अक्षर पटेल, आर अश्विन, कागिसो रबाडा, आवेश खान आणि एनरिक नॉर्खिया.
कोलकाता Playing XI : शुबमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, इयॉन मॉर्गन (कर्णधार), शाकिब अल हसन, दिनेश कार्तिक, सुनील नरेन, शिवम मावी, लोकी फर्गुसन आणि वरुण चक्रवर्ती.
पंतची अंपायरसोबत मस्ती