यूएई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात (Qualifier 2) दिल्ली (DC) विरुद्ध कोलकाता (KKR) आमनेसामने भिडणार आहेत. अंतिम फेरीत पोहचण्यासाठी दोन्ही संघात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.  या सामन्यात जिंकणारा संघ हा अंतिम सामन्यात चेन्नई विरुद्ध विजेतेपदासाठी भिडेल. या सामन्याबद्दल आपण सर्व (KKR vs DC Live Streaming) जाणून घेऊयात. (IPL 2021 Qualifier 2 delhi capitals vs kolkata knight riders live streaming when and where to watch online free in marathi today 13 october 2021)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॅच किती वाजता आणि कुठे? 


या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये (Sharjah Cricket Stadium) सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस उडवण्यात येणार आहे. 


लाईव्ह टेलिकास्ट कुठे पाहता येणार?


हा  रंगतदार सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टारवरही पाहता येईल.


अशी आहे आकडेवारी


दिल्ली आणि कोलकाता आयपीएलच्या इतिहासातात एकूण  29 वेळा मैदानात एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. त्यापैकी 15 सामने कोलकाता संघ जिंकला आहे. तर 13 सामने जिंकण्यात दिल्ली संघाला यश आलं आहे. तर एका सामन्याचा निर्णय झाला नाही. 


दिल्ली कॅपिटल्स :  रिषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, शिमरॉन हेटमायर, टॉम करन, रवीचंद्रन अश्विन, खगिसो रबाडा, आवेश खान, अनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, उमेश यादव, स्टीव्ह स्मिथ, सॅम बिलिंग्स, मार्कस स्टोयनिस, लुकमन मेरीवाला, बेन द्वारशुईस, प्रवीण दुबे, विष्णू विनोद, कुलवंत खेजरोलिया, ललित यादव आणि रिपल पटेल. 


कोलकाता : दिनेश कार्तिक (विकेटकीपर), इऑन मॉर्गन (कर्णधार), शुबमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, सुनील नारायण, शाकिब अल हसन, लॉकी फर्ग्युसन, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, हरभजन सिंग, टीम साउथी, आंद्रे रसेल, बेन कटिंग, करुण नायर, पवन नेगी, कुलदीप यादव, गुरकीरत सिंग मान, शेल्डन जॅक्सन, संदीप वॉरियर, टीम सेफर्ट, प्रसिध कृष्णा, रिंकू सिंग, कमलेश नगरकोटी आणि वैभव अरोरा.