मुंबई: कोरोनामुळे देशात धुमशान घातलं आहे. दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांच्या जवळच्या व्यक्ती कोरोनामुळे गेल्यानं कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर बायो बबलमध्ये कोरोना घसल्यामुळे आयपीएलचे सामने तूर्तास स्थगित करण्यात आले आहेत. राजस्थान संघातील ऑलराऊंडर खेळाडूनं तर घरी पोहोचण्याआधी रुग्णालयाची वाट धरली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

22 वर्षांचा गोलंदाज चेतन साकरिया याची IPLमध्ये खूप चर्चा होती. आपल्या चांगल्या फॉर्मनंतर IPLच्या सामन्यांना कोरोनामुळे ब्रेक लागला. सर्व खेळाडूंनी घरची वाट धरली पण चेतन थेट रुग्णालयात पोहोचला. चेतनच्या वडिलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 


चेतनच्या वडिलांवर भावनगरजवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार ऑक्शनमध्ये 1.2 कोटी रुपये देऊन राजस्थान फ्रांचायझीने त्याला आपल्या संघात समाविष्ट करून घेतलं होतं. चेतनला त्याच्या पगाराचा वाटा मिळाला आहे. हा पगार तो आपल्या वडिलांच्या उपचारासाठी वापरणार असल्याचं सांगितलं आहे. 


चेतनने आपल्या भावाला आधीच गमवलं आहे. त्यामुळे घराचा आधार सध्या तोच आहे. आपले वडील लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी तो प्रार्थना करत आहे. इतकच नाही तर आपला सगळा पगार त्यांच्या उपचारासाठी देणार असल्याचंही चेतननं सांगितलं आहे. 


IPLला नावं ठेवणाऱ्यांना चेतनचं सडेतोड उत्तर


लोक म्हणतात आयपीएल बंद करा, असं म्हणणाऱ्या लोकांना  मला काहीतरी सांगायचे आहे. माझ्या कुटुंबात मी एकटाच आहे. माझ्या कमाईचा स्रोत फक्त क्रिकेट आहे. क्रिकेट आणि आयपीएलमधून मिळणाऱ्या पैशातूनच मी माझ्या वडिलांवर चांगले उपचार करण्यास सक्षम आहे. जर ही स्पर्धा 1 महिना नसती तर माझ्यासाठी ते खूप कठीण झालं असतं. मी एका गरीब कुटुंबातून आलो आहे. माझ्या वडिलांनी आयुष्यभर टेम्पो चालवला. या आयपीएलमुळे माझं आयुष्य बदललं आहे. " 


महिला क्रिकेट संघातील वेदा कृष्णमूर्तीच्या आई-बहिणीचं कोरोनामुळे निधन


भारतीय महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्ती तिच्या आयुष्यातील दु: ख संपवण्याचे नाव घेत नाही. आधी कोरोनामुळे आईचं छत्र हरपलं आणि आता बहिणीनेही साथ सोडली आहे. कोरोनामुळे वेदाची बहिण वत्सला शिवकुमारचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दोन आठवड्यापूर्वी वेदाच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.