मुंबई: हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स झालेल्या सामन्यात जोस बटलरने खूप चांगली कामगिरी केली आहे. त्यानंतर त्याचं खूप कौतुक झालं. त्याचा एक व्हिडीओ सध्या तुफान चर्चेत आला आहे. जोस बटलर याने गंगनम स्टाइलने डान्स केला आहे. हा डान्स सोशल मीडियावर तुफान चर्चेचा विषय ठरला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की जोस भाई म्हणजेच जोस बटलर आणि दिशांत याग्निक या दोघांनी जबरदस्त डान्स केला आहे. जोस बटलरने गंगनम स्टाइलने केलेला डान्स सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. राजस्थान रॉयल्स संघाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. हा व्हिडीओ एक पार्टीदरम्यानचा असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओमध्ये जोस बटलर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. 



संजू सॅमसनने जोस बटलरला जोस भाई नाव दिलं होतं. त्याला राजस्थान संघातील इतर खेळाडू जोस भाईचं म्हणतात. हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने शतकी खेळी केली होती. त्याच्या या कामगिरीमुळे राजस्थानला 55 धावांनी हैदराबादवर विजय मिळवता आला. 


IPLवर कोरोनाचं संकट, सामने तुर्तास स्थगितच


BCCIने IPLच्या तीन संघातील 4 खेळाडू आणि एका संघाचे कोच कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित केला आहे. तर खेळाडूंना त्यांच्या कुटुंबियांसह आपल्या घरी जाण्याचे निर्देश दिले आहेत. 


बीसीसीआय कोणत्याही प्रकारे सहाय्यक कर्मचार्‍यांच्या किंवा त्यांच्या स्पर्धेच्या आयोजनात सामील असलेल्या व्यक्तींच्या सुरक्षेची तडजोड करू शकत नाही. सर्वांच्या सुरक्षा, आरोग्य आणि कल्याण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. ही खूप कठीण वेळ आहे, विशेषत: भारतात अशा वेळी आम्ही लोकांमध्ये काही सकारात्मक आणि उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला.