मुंबई: चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामना नुकताच पार पडला. बंगळुरूच्या विजयाचा रथ चेन्नई सुपरकिंग्स संघ आणि थालाने मिळून रोखला. यात महत्त्वाची भूमिका बजावली ती सर जडेजानं. शेवटच्या ओव्हरमध्ये सर जडेजानं संपूर्ण मैदान दणाणून सोडलं. बंगळुरू विरुद्ध चेन्नई झालेल्या सामन्यात जडेजाचा मैदानात तुफानी जलवा पाहायला मिळाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेवटच्या ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंर्स बंगळुरू संघाकडून हर्षल पटेल बॉलिंगसाठी आला. त्यावेळी रविंद्र जडेजानं आपली विकेट न जाऊ देता एकावर एक अक्षरश: सिक्स ठोकले. नो बॉल देखील त्याने सिक्स मारायचा सोडला नाही. 5 सिक्स एक चौकार दोन रन काढत त्याने 25 बॉलमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं.





रविंद्र जाडेजाने खेळलेला संपूर्ण शेवटचा ओव्हर पाहण्यासाठी इथे क्लिक करा. 


रविंद्र जडेजा इतक्यावरच थांबला नाही तर तीन विकेट्स देखील घेतल्या आहेत. वॉशिंग्टन सुंदर, ग्लॅन मॅक्सवेल आणि ए बी डिव्हिलियर्स या तिघांनाही तंबुत धाडण्याचं काम जडेजानं केलं. चार ओव्हरमध्ये त्याने केवळ 13 धावा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला दिल्या आहेत. 


चेन्नई सुपरकिंग्स संघाने 69 धावांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर विजय मिळवला आहे. सलग चार सामने जिंकणाऱ्या कोहली सेनेला रविंद्र जडेजानं शेवटच्या ओव्हरमध्ये मोठा धक्का देत सामन्यावर आपली पकड मजबूत केली. त्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील जबरदस्त कामगिरी केली आहे. जडेजाच्या या अष्टपैलू कामगिरीचं तुफान कौतुक होत आहे.