मुंबई: सनरायझर्स हैदराबाद संघ पराभूत झाल्यानंतर तुम्ही मिस्टी गर्ल काव्या मारनचे रडतानाचे अनेक फोटो पाहिले असतील. पण आज आपल्या पतीच्या यशसासाठी आनंदाच्या भरात अश्रू आल्याचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील बॉलरला IPL 2021च्या या हंगामात पहिली विकेट काढण्यात यश मिळाल्यानं आनंदानं कर्णधार विराट कोहलीनं मिठी मारली. तर पत्नीला अश्रू अनावर झाले आणि स्टेडियममध्ये रडू कोसळलं. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहेत. पत्नी भावूक झाल्यानं तिचे हावभाव कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.


                        Dhanashrees reaction after chahals first Wicket of #IPL2021




रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील बॉलर युजवेंद्र चहल याला मुंबई इंडियन्स आणि हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात एकही विकेट घेण्यात यश मिळालं नव्हतं. मात्र नुकत्याच झालेल्या कोलकाता विरुद्ध सामन्यात त्याने पहिली विकेट घेतल्यानंतर आनंद साजरा केला. तर पत्नीला स्टेडियममध्ये युजवेंद्रनं पहिली विकेट घेतल्यावर रडू कोसळलं.


मुंबई इंडियन्स, हैदराबाद आणि कोलकाता विरुद्ध झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये बंगळुरू संघाने शानदार विजय मिळवला आहे. विराटसेनेची गाडी सुसाट आहे. IPL2021च्या पॉईंट टेबलमध्ये RCB संघाने पहिलं स्थान पटकावलं आहे.