मुंबई : इयोन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील केकेआरने एलिमिनेटर सामन्यात आरसीबीचा पराभव करत पॉईंट्स टेबलच्या दुसऱ्या क्रमांकावर आपले स्थान पक्के केले. प्रथम, केकेआरने आरसीबीला सात विकेट्सवर 138 धावांवर रोखले. यानंतर, दोन बॉल आणि चार विकेट शिल्लक असताना केकेआरच्या विजयाची नोंद झाली. आता दुसऱ्या क्वालिफायरमध्ये त्यांचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरसीबीने संपूर्ण लीग फेरीत उत्तम खेळ दाखवला, पण सोमवारी टीम तिच्या फॉर्ममध्ये दिसली नाही. त्यात संघाच्या काही चुका त्यांना खूप महागात पडल्या.


विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामुळे त्याला खूपच किंमत मोजावी लागली. त्याला वाटले की, सामन्याच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करणे कठीण होईल. मात्र, जे घडले ते उलट होते.


नाणेफेक गमावल्यानंतरही इऑन मॉर्गनने असेही म्हटले की, त्याला आनंद आहे कारण त्याला स्कोरचा पाठलाग करायचा आहे, जे सोपे आहे. पाठलाग करताना अनेक संघांना विजय मिळाल्याचेही गेल्या काही सामन्यांमध्ये दिसून आले. अशा परिस्थितीत कोहलीने आधी गोलंदाजी करणे अधिक चांगले ठरले असते.


सुनीर नरेनने या सामन्यात अष्टपैलू खेळ दाखवला, ज्यामुळे आरसीबीला मोठा झटका बसला कारण आरसीबी संघातील बिग थ्री अर्थात विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेल यांना सेट होण्याची संधीच नरेनने दिली नाही, ज्यामुळे संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला.


नरेनने चार षटकांत 21 धावा देऊन चार बळी घेतले. त्यानंतर त्याने फलंदाजीमध्ये चमत्कार केले. त्याने 15 चेंडूत 26 धावांच्या डावात तीन सिक्स ठोकले, ज्यामुळे तो बाद झाल्यानंतरही संघावर दबाव आला नाही.


आरसीबीने गोलंदाजी करताना दोन महत्त्वाचे झेल सोडले ज्यामुळे त्याचा परतीचा मार्ग निश्चित झाला. नवव्या ओव्हरमध्ये अहमद शहजादने मॅक्सवेलच्या चेंडूवर व्यंकटेश अय्यरचा झेल सोडला. तर 17 व्या ओव्हरमध्ये पडिकलने सुनील नरेनचा झेल सोडला. हे महत्वाचे दोन विकेट्स घेऊन आरसीबी या सामन्यात पुनरागमन करू शकला असता. परंतु त्यांना ते करता आले नाही ही, त्यांची सगळ्यात मोठी आणि दुसरी चुक ठरली.


विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी आरसीबीसाठी झटपट सुरुवात केली. दोघांनी पाच षटकांत 49 धावा केल्या होत्या. पण त्यानंतर संघाला त्याचा लाभ घेता आला नाही. सलामीची जोडी वगळता एकही फलंदाज 20 चा आकडा देखील पार करू शकला नाही.


अनुभवी खेळाडू एबी डिव्हिलियर्स व्यतिरिक्त, शेवटच्या सामन्याचे नायक श्रीकर भारत आणि शाहबाज अहमद फलंदाजी करू शकले नाहीत, ज्यामुळे संघ 20 षटकांत फक्त 138 धावा करू शकला. ज्यामुळे मोठी धावसंख्या करु न शकल्याने देखील आरसीबीचं चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा एकदा अर्धवट राहिलं.