मुंबई: IPL 2021चा चौदावा हंगाम अतिशय चुरशीचा सुरू आहे. चेन्नई सुपकिंग्स, बंगळुरू, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली या चार संघांमध्ये चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे राजस्थान आणि हैदराबाद संघ अगदी मागे पडत असल्याचं दिसत आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध बंगळुरू सामन्यावरून गौतम गंभीर यांनी भारतीय फलंदाजाला चांगलंच फैलावर घेतलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौतम गंभीर यांच्या म्हणण्यानुसार हा फलंदाज सुरुवात चांगली करतो मात्र नंतर काहीच करत नाही. म्हणजे धावा काढल्या तर एका वेळी 80 ते 90 नाहीतर काहीच नाही अशी तऱ्हा असते. गौतम गंभीर राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसनवर खूप संतापले.


राजस्थान रॉयल्स संघाला चार पैकी तीन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या सामन्यात संजू सॅमसननं 119 धावांची खेळी केली. तर दुसऱ्या 4 तिसऱ्या 1 आणि चौथ्या सामन्यात 21 धावा काढून आऊट झाला. संजू सॅमसन चांगली कामगिरी करू शकला नाही. यावर सुनील गावस्कर यांनी देखील निशाणा साधला होता. आता त्यांच्यानंतर गौतम गंभीर यांनी फैलावर घेतलं आहे. 


तुम्ही जर मागच्या काही IPLचे सामने पाहिले असतील तर  संजू सॅमसननं सुरुवात चांगली केली मात्र नंतर त्याची कामगिरी चांगली राहिलेली  नाही. त्याच्या ग्राफमध्ये कायमच अनियमितता दिसून आली आहे. एका उत्तम खेळाडूचा खास कायमच संतुलित असायला हवा असंही गौतम गंभीर यावेळी म्हणाले. 


गौतम गंभीर यांनी रोहित शर्मा, विराट कोहली ए बी डिव्हिलियर्सचं उदाहरण देखील दिलं आहे. हे फलंदाज जर एखाद्यावेळी धावा करू शकले नाहीत तर दुसऱ्या सामन्यात ते 30 ते 40 धावा करून आपलं योगदान देतात असंही गौतम गंभीर यावेळी म्हणाले आहेत. संजू सॅमसनच्या अनियमित ग्राफवरून गौतम गंभीर यांनी त्याच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे.