IPL 2021 : रॉयल चॅलेंजर्ससह आणखी एका संघाला मोठा धक्का, तीन खेळाडूंनी सोडलं IPL
आर अश्विननं दिल्ली कॅपिटल्स संघातून ब्रेक घेतल्याचं जाहीर केलं. त्या पाठोपाठ आणखी दोन संघांमधील खेळाडूंनी IPLमधून माघार घेतली आहे.
मुंबई: यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक खेळाडू IPLमधून बाहेर जाताना दिसत आहे. नुकताच आर अश्विननं दिल्ली कॅपिटल्स संघातून ब्रेक घेतल्याचं जाहीर केलं. तर याआधी जोफ्रा आर्चर IPLमधून बाहेर झाला होता. राजस्थान संघातील मुख्य खेळाडू बाहेर जात असल्यानं संघाला मोठा धक्का बसला आहे. आधी बेन स्टोक्स नंतर जोफ्रा आर्चर आणि आता ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजही IPL सोडून ऑस्ट्रेलियामध्ये गेला आहे. दुसरीकडे रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी वाईट बातमी आहे. दोन खेळाडू IPLमधून बाहेर झाल्याची माहिती मिळाली आहे.
रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघानी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. RCB संघातील खेळाडू एडम झम्पा आणि केन रिचर्डसन काही कारणांमुळे ऑस्ट्रेलियात परत गेले आहेत. 2021 मध्ये यापुढे होणाऱ्या सामन्यांमध्ये त्यांची अनुपस्थिती असेल. त्यांनी IPL सोडल्याची माहिती RCB ने ट्वीट करून दिली आहे.
रॉयल्स चॅलेंजर्स संघासह फ्रांचायझीने त्यांच्या निर्णयाला सपोर्ट करणार असल्याचंही सांगितलं आहे. कोहलीच्या संघाला हा मोठा धक्का बसला आहे. 29 वर्षांच्या लेग स्पिनर झम्पाला आतापर्यंत झालेल्या सामन्यात एकदाही खेळण्याची संधी मिळाली नाही. मागच्या हंगामात त्याने 3 सामने खेळले होते.
एन्ड्र्यू टाई काही खासगी कारणांमुळे IPL सोडून ऑस्ट्रेलियाला गेल्याचं राजस्थानच्या संघाने सांगितलं आहे. त्याला कोणत्याही मदतीची आवश्यकता असेल तर ती केली जाईल असंही ट्वीटरवर सांगण्यात आलं आहे. याआधी राजस्थान संघातील बेन स्टोक्स दुखापतीमुळे IPLमधून बाहेर झाला होता.