दुबई: दुसऱ्या टप्प्यातील आयपीएलचे सामने सुरू झाले आहेत. चेन्नई सुपरकिंग्स संघाने टॉस जिंकला असून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात मोठा बदल करण्यात आला आहे. मुंबईचा कर्णधार या सामन्यासाठी रोहित शर्मा नाही तर किरोन पोलार्ड असणार आहे. रोहित शर्मा खेळत नसल्यानं चाहत्यांची निराशा झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्माच नाही तर आणखी काही खेळाडू हा सामना खेळणार नाहीत. दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे चाहत्यांची काहीशी निराशा झाली आहे. MI विरुद्ध CSK चा सामना दुबई इंटरनेशनल स्टेडियम UAE इथे होत आहे. 


मुंबई इंडियन्स संघातून रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या या सामन्यात दिसणार नाहीत. चेन्नई संघाकडून सॅम कुरेन देखील या सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे सॅमला चेन्नईचे चाहते खूप मिस कऱणार आहेत. 


मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), किरोन पोलार्ड (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, कृणाल पांड्या, एडम मिलने, राहुल चाहर, सौरभ तिवारी, अनमोलप्रीत सिंह, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.


चेन्नई सुपरकिंग्स प्लेइंग इलेव्हन: फॉफ डुप्लेसी, ऋतुराज गायकवाड, मोइन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, इमरान ताहीर, जोश हेजलवूड.