मुंबई: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध निसटता विजय खेचून आणण्याचं काम राजस्थान रॉयल्स संघाने केलं. दिल्ली विरुद्ध सामन्यात 3 विकेट्सनं विजय मिळवला आहे. पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात राजस्थान पराभूत झालं होतं. मात्र दिल्ली विरुद्ध झालेल्या सामन्यात राजस्थान संघानं आपली कसब दाखवली आहे. राजस्थान संघातील एका खेळाडूवर वीरेंद्र सेहवाग खुश झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थान संघाला विजय मिळवून देण्यात या खेळाडूचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर खुश होऊन सहवागनं ट्वीट केलं आहे. RR संघातील सर्वात महागडा खेळाडू ख्रिस मॉरिसवर सेहवाग खूप खुश झाला आहे. त्याने 18 चेंडूमध्ये 36 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. इतकच नाही तर त्याने 4 चौकारही ठोकले. 






वीरेंद्र सेहवागनं दोन्ही सामन्यांमधील ख्रिस मॉरिसचे फोटो एकत्र शेअर करत हटके पद्धतीनं ट्वीट केलं आहे. त्याच्या ट्वीटनंतर सोशल मीडियावर तुफान मीम्स देखील नेटकऱ्यांनी शेअर केले आहेत. 


वीरेंद्र सेहवाग काय म्हणाला?
वीरेंद्र सेहवाग नेहमीच विनोदी आणि बोलक्या शैलीसाठी ओळखला जातो. राजस्थानकडून खेळताना ख्रिस मॉरिसच्या दोन सामन्यांमधील स्थितीचे वर्णन केलं. पहिल्या फोटोवर तो म्हणाला की पैसे मिळाले पण इज्जत नाही तर दुसऱ्या फोटोवर कॅप्शन देत आता इज्जही मिळाली आणि पैसाही असं ट्वीट करत ख्रिस मॉरिसचं कौतुक केलं आहे. तर दुसरीकडे नेटकऱ्यांनी इज्जत तर पूर्ण मिळालीच पाहिजे आता, 16.25 कोटी वर्थ आहेत असं म्हणत मीम्स देखील शेअर केले आहेत.