मुंबई: राजस्थान रॉयल्स संघावर बंगळुरू संघाने 10 गडी राखून एकहाती विजय मिळवला. या दणदणीत विजयात देवदत्त पडिक्कल आणि विराट कोहली तसंच विराटसेनेतील गोलंदाजांचा देखील सिंहाचा वाटा आहे. राजस्थानच्या फलंदाजीदरम्यान हर्षल पटेल संतापल्याचं पाहायला मिळालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानचा युवा फलंदाज रियान परागने 15 चेंडूमध्ये 25 धावा केल्या. त्याची शानदार फलंदाजी सुरू होती. तर हर्षल पटेलला राग येत होता. तिसऱ्या बॉलवर मोठा शॉट खेळण्याच्या तयारीत असलेला रियान आऊट झाला. हर्षल पटेलने टाकलेल्या बॉलवर कॅच आऊट झाल्यानंतर त्याने संताप व्यक्त केला आहे. तर रियानची मोठी निराशा झाली. या दोघांचेही हावभाव कॅमेऱ्यात टिपण्यात आले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 



हर्षल पटेलनं यंदाच्या IPLमध्ये दमदार गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत त्याच्या नावावर 12 विकेट्स आहेत. त्यानं पर्पल कॅपवर आपलं नाव कायम ठेवलं आहे. 


दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आपला विजयाचा चौकार मारला आहे. सलग चौथा सामना जिंकल्यानं उत्साहाचं वातावरण आहे. हा सामना एकहाती 10 विकेट्स राखून जिंकला. देवत्तनं शतकी खेळी केली तर विराट कोहलीनं 72 धावा करत राजस्थाननं दिलेलं लक्ष्य पूर्ण करत 180 धावांची खेळी केली.