मुंबई: कोरोनामुळे यंदा IPL 2021चे 31 सामने स्थगित करण्यात आले आहेत. हे सामने सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान होणार आहेत. इंग्लंडमध्ये टी 20 लीग खेळवली जात आहे. या लीगमध्ये खूपच चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. पण सध्या चर्चेत आहे तो म्हणजे एक खेळाडू. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने ज्या व्यक्तीला KKR संघातून बाहेर काढलं त्यानेच आता जबरदस्त कामगिरी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलचा कोलकाता संघातील माजी खेळाडूने शानदार शतक ठोकलं आहे. टी 20 ब्लास्टमध्ये सोमवारी केंट आणि समरसेट या दोन संघांमध्ये सामना खेळवण्यात आला होता. समरसेटने 10 विकेट्स आपल्या नावावर करत सामना आपल्या खिशात घातला. युवा फलंदाज टॉम बँटनने दमदार शतक झळकवलं. अवघ्या 47 चेंडूमध्ये त्याने हा पराक्रमक केला. त्यामुळे त्याचं कौतुक होत आहे. 


टॉम बँटनने 51 चेंडूमध्ये 8 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने एकूण 107 धावांची खेळी केली. त्याला  डेवॉन कॉन्वेची साथ मिळाली आणि त्यांनी खेळात जान आणली असं म्हणायला हरकत नाही. कॉन्वेनं 44 चेंडूमध्ये 51 धावा केल्या. 


टी 20 वर्ल्ड कपच्या तारखां जाहीर, UAEसोबत पहिल्यांदाच 'या' देशात होणार सामने


2020  च्या आयपीएलच्या लिलाव काळात शाहरुख खानच्या टीम केकेआरने दमदार खेळणाऱ्या टॉम बँटनला आपल्या संघात घेतलं होतं. पण त्याला खेळायला फारशी संधी दिली गेली नव्हती. यावर्षी लिलावाच्या केकेआरने त्याला सोडले. बँटनची सध्याची कामगिरीपाहून कोलकाता संघाला नक्कीच पश्चाताप झाला असावा असा कयास चाहत्यांनी लावला आहे.