मुंबई: दिल्ली विरुद्ध झालेल्या सामन्यात हैदराबाद संघाने पुरेपुर प्रयत्न केले मात्र सुपरओव्हरमध्ये मोठा दणका बसला आणि सामना हातून गमवला. दिल्ली संघाने सुपर ओव्हरमध्ये 8 धावा करून सामन्यात विजय मिळवला आहे. तर हैदराबाद संघाला चौथा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर माजी क्रिकेटरकडून मोठा संताप व्यक्त करण्यात आला असून त्यांनी हैदराबादच्या कर्णधाराची चांगलीच फिरकी घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यांनी वॉर्नरची फिरकी घेत विचारलेला प्रश्न सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 


वीरेंद्र सेहवागने ट्विट करत प्रश्न विचारला की, 'सुपर ओव्हरदरम्यान जॉनी बेअरस्टो टॉयलेटमध्ये होता? हैदराबाद संघाकडून त्याला खेळण्यासाठी सुरुवातीला का उतरवण्यात आलं नाही ते मला समजत नाही. त्याने 18 बॉलमध्ये 38 धावा केल्या आहेत. सर्वात क्लीन हिटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेअरस्टोकला सुपर ओव्हरमध्ये पहिल्यांदा का उतरवलं नाही. हैदराबाद संघाने सामना खूप चांगला खेळला मात्र शेवटच्या अजब निर्णयामुळे स्वत:च्या हातून सामना घालवला आणि या विचित्र निर्णयासाठी स्वत:लाच दोषी ठरवले आहे.' 




या सामन्यात दिल्ली कॅपिटलने पहिल्यांदा फलंगाजी करत 4 गडी गमावून 129 धावा केल्या आणि हैदराबाद संघाला 160 धावांचं लक्ष्य दिलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबाद संघाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 159 धावा केल्या. त्यामुळे मॅच टाय झाली आणि सुपर ओव्हर खेळावी लागली.  


या सुपर ओव्हरमध्ये दिल्ली संघाने अक्षर पटेलवर बॉलिंगची तर शिखर धवन आणि ऋषभ पंत स्वत: बॅटिंगसाठी मैदानात उतरले. सुपर ओव्हरसाठी हैदराबादकडून केन विल्यमसन आणि वॉर्नर मैदानात उतरले मात्र बेअरस्टोला संधी देण्यात आली नाही. हैदराबाद संघ मात्र सुपर ओव्हरमध्ये कमी पडला. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाचा विजय झाला.