मुंबई: कोलकाता विरुद्ध हैदराबाद चेपॉक स्टेडियमवर सामना पार पडला. कोलकाता संघाने 10 धावांनी हैदराबादवर विजय मिळवला आहे. सलग तिसऱ्यांदा हैदराबादवर विजय मिळवला आहे. तसं पाहायला गेलं तर हैदराबाद संघानं हा सामना जिंकून KKR संघानं सेंच्युरी केली आहे. IPL सामन्यांना सुरुवात झाल्यापासून ते आतापर्यंत या संघानं 100 सामने जिंकले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकातानं हैदराबादवर 10 धावांनी विजय मिळवल्यानंतर त्यांनी जिंकलेल्या 100 व्य़ा सामन्याचं खास केक कापून सेलिब्रेशन केलं. त्याचा व्हिडीओ कोलकाता नाईट रायडर्सनं आपल्या इन्स्टावर शेअर केला आहे. 100 वा सामना जिंकल्याबद्दल शुभेच्छा कॅप्शनमध्ये देण्यात आल्या आहेत. नितीश राणा आणि राहुल त्रिपाठी यांनी हैदराबाद विरुद्ध सामन्यात केलेली मोलाची अर्धशतकी भागीदारी या विजयात मोठी आहे. त्यांचंही खूप कौतुक करण्यात आलं. 



कोलकाता संघाचा इतिहास पाहायला गेला तर IPLला सुरुवात झाली तेव्हापासून म्हणजे 2008 पासून ते 2021 पर्यंत या संघाने 197 सामने खेळले आहेत. त्यापैकी 97 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला तर 100 सामन्यांमध्ये विजय झाला.


एक नजर कोलकाताच्या सामन्यांवर 


2008- 14 सामने खेळले- 6 सामने जिंकले, 7 सामन्यांमध्ये पराभव
2009- 14 सामने खेळले- 3 सामने जिंकले, 10 सामन्यांमध्ये पराभव
2010- 14 सामने खेळले- 7 सामने जिंकले, 7 सामन्यांमध्ये पराभव
2011- 15 सामने खेळले- 8 सामने जिंकले, 7 सामन्यांमध्ये पराभव
2012- 18 सामने खेळले- 12 सामने जिंकले, 5 सामन्यांमध्ये पराभव
2013- 16 सामने खेळले- 6 सामने जिंकले, 10 सामन्यांमध्ये पराभव
2014- 16 सामने खेळले- 11 सामने जिंकले, 5 सामन्यांमध्ये पराभव
2015- 14 सामने खेळले- 7 सामने जिंकले, 6 सामन्यांमध्ये पराभव
2016- 15 सामने खेळले- 8 सामने जिंकले, 7 सामन्यांमध्ये पराभव
2017- 16 सामने खेळले- 9 सामने जिंकले, 7 सामन्यांमध्ये पराभव
2018- 16 सामने खेळले- 9 सामने जिंकले, 7 सामन्यांमध्ये पराभव
2019- 14 सामने खेळले- 6 सामने जिंकले, 8 सामन्यांमध्ये पराभव
2020- 14 सामने खेळले- 7 सामने जिंकले, 7 सामन्यांमध्ये पराभव
2021- 1 सामना खेळला आणि तो जिंकला