मुंबई: IPL 2021 अवघे काही दिवस शिल्लक असतानाच माहीला मोठा दिलासा मिळाला आहे. संघातील स्टार खेळाडू पुन्हा फिट होऊन आल्यामुळे माही जिंकण्यासाठी मास्टरप्लॅन तयार करत आहे. 9 एप्रिलपासून 8 संघ IPLच्या ट्रॉफीसाठी मैदानात आमनेसामने येणार आहेत. 30 मे रोजी शेवटचा सामना खेळला जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्णधार महेंद्र सिंह धोनीची CSKटीम पुन्हा एकदा दमदार नियोजनपद्धतीनं मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. चेन्नई सुपरकिंग्सचा पहिला सामना 10 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्ससोबत मुंबईत संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. 


CSKसंघात सुरेश रैना परत आल्यानं फलंदाजीसाठी टीमला अधिक मजबूती मिळेल असा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला विश्वास आहे. मागच्या IPLच्या हंगामात सुरेश रैनाची कामगिरी विशेष नव्हती. मात्र आताच्या हंगामात पुन्हा एकदा त्याला उत्तम कामगिरी करण्याची संधी मिळाली आहे. सुरेश रैना व्यतिरिक्त फाफ डुप्लेसिस, माही स्वत:, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, रविंद्र जडेजा, सॅम करन, मोईन अली, ऋतुराज गायकवाड या खेळाडूंसोबच CSK टीमने फलंदाजांची मजबूत फळी उभी केली आहे. त्याचा पुरेपुर फायदा कर्णधार धोनीच्या टीमला आयपीएलदरम्यान होणार आहे. 


CSKटीममध्ये आक्रमक गोलंदाजही आहेत. लुंगी एनगिडी, शार्दुल ठाकुर, सॅम करन, इमरान ताहिर, जडेजा आणि दीपक चहर सारखे माहीर गोलंदाज संघाला मिळाल्यामुळे यावेळी माहीचा विजयासाठी मास्टरप्लॅन तयार आहे. सर्वजण IPL सुरू होण्याची आतूरतेनं वाट पाहात आहेत. 


CSK संघामध्ये कोणकोण? 


महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), रॉबिन उथप्पा, सुरेश रैना, अंबाती रायडू, केएम आसिफ, दीपक चहर, ड्वेन ब्रावो, फाफ डुप्लेसिस, इमरान ताहिर, एन जगदीशन, कर्ण शर्मा, लुंगी एनगिडी, मिशेल सेंटनर, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, सॅम करन, आर साई किशोर, मोईन अली, कृष्णप्पा गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा, सी हरि निशांत