IPL 2021 Suspend: `बाबा लवकर बरे व्हा`, कोव्हिड विरुद्ध लढण्यासाठी चिमुकलीने दिलं बळ
कोव्हिड विरुद्ध लढण्यासाठी चिमुकलीकडून बाबाला खास मेसेज, विकेटकीपर म्हणाला...
मुंबई: IPLमध्ये कोरोना शिरला आणि एकामागोमाग एक कोव्हिड पॉझिटिव्ह खेळाडू येऊ लागल्याने IPL 2021 तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय BCCIने घेतला आहे. कोलकाता संघातील 2 खेळाडू तर हैदराबाद आणि दिल्ली संघातील एका खेळाडूचा कोरोना रिपोर्ट मंगळवारी पॉझिटिव्ह आला होता.
हैदराबाद संघातील विकेटकीपर ऋद्धिमान साहाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याला क्वारंटाइन करण्यात आलं आहे. साहा लवकर बरा व्हावा यासाठी चाहत्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली आहे. साहाच्या मुलीनं त्याच्यासाठी खास मेसेज लिहिला आहे. तो मेसेज पाहून वडील ऋद्धीमान साह भावुक झाला. हेच माझं जग आहे म्हणत त्याने आपल्या चिमुकलीचा मेसेज ट्वीट केला आहे.
संसर्ग झालेल्यांना सध्या BCCIने ठरवलेल्या मेडिकल फॅसिलिटी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. साहा लवकर बरा व्हावा यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत. साहाच्या मुलीच्या सोशल मीडियावर असाच एक संदेश पोस्ट केला आहे. साहाने आपली मुलगी मियाच्या हाताने काढलेल्या चित्राचा एका फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये सुपरमॅन एक कोरोनाव्हायरसशी लढत आहे. 'बाबा, लवकर बरे व्हा', असं कॅप्शन या चिमुकलीनं या फोटोसाठी दिलं आहे.
यंदाच्या हंगामात साहाला खेळण्याची जास्त संधी मिळाली नाही. पहिल्या दोन सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून भारतीय विकेटकीपरने सलामी आणि विकेटकीपिंग केली. त्यानंतर त्याची कामगिरी चांगली नसल्यानं पुढचे सामने खेळण्याची संधी देण्यात आली नाही. त्यानंतर आयपीएल कोरोनामुळे स्थगित करण्यात आले.