टी नटराजनचा गॉडफादर! IPLमध्ये पहिल्यांदा कोणी दिली संधी?
टेनिस बॉलनं क्रिकेट खेळण्याचा सुरु झालेला प्रवास व्हाया IPL आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यापर्यंत कसा पोहोचला, टी नटराजनची Success Story
मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या यॉर्कर गोलंदाजीनं जो रूट, बेन स्टोक्स सारख्या फलंदाजांची दांडी गुल करणाऱ्या टी नटराजनचा 30वा वाढदिवस आहे. टी नटराजनचा आजपर्यंतचा प्रवास नक्कीत सोप नव्हता. त्याची जिद्द आणि मेहनत पुन्हा एकदा दाखवण्याची त्याला IPLमधून संधी मिळाली आहे.
सनरायझर्स हैदराबाद संघाकडून टी नटराजन IPLमध्ये खेळताना दिसणार आहे. पण नटराजननं आपल्या खेळाची सुरुवात कशी केली? त्याचा हा प्रवास कसा होता याबद्दल आज आपण जाणून घेऊया.
तमिळनाडूमधील चिन्नापाम्पट्टी नावाच्या एका छोट्याशा गावातून टी नटराजन आला आहे. त्याची आई मोलमजुरी करून कुटुंबाचं पोट भरायची. त्यावेळी फार बरी परिस्थिती नव्हती. सुरुवातीला टेनिसच्या बॉलनं क्रिकेट खेळण्याचा सुरु झालेला हा प्रवास आता आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचला ते नटराजनच्या मेहनतीमुळेच.
एक दिवस टेनिस बॉलनं क्रिकेट खेळताना कोच जयप्रकाश यांनी टी नटराजनला पाहिलं. त्यावेळी ते भारावून गेले. त्यांनी तमिळनाडू लीगमध्ये त्याला संधी दिली. त्यानंतर वीरेंद्र सेहवाग यांनी किंग्स इलेवन पंजाबमध्ये पहिल्यांदा IPL खेळण्याची संधी 2017 रोजी मिळवून दिली.
IPLमध्ये टी नटराजन आजही आपल्या जर्सीवर कोच जेपी यांचं नाव लिहितो. त्यांनी 2017च्या IPLमध्ये 6 सामन्यात 2 विकेट्स घेतल्या. 2018मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघानं त्याला समाविष्ट करून घेतलं. मात्र 2018 आणि 2019मध्ये त्याला खेळण्याची संधी देण्यात आली नाही.
2020मध्ये टी नटराजननं आपल्या यॉर्कर गोलंदाजीनं अनेक मोठ्या फलंदाजांना तंबुत धाडलं.16 सामन्यांमध्ये त्याने 16 विकेट्स घेतल्या. त्याची ही कामगिरी पाहून त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली. त्यापाठोपाठ आता इग्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यात देखील टी नटराजननं आपली कामगिरी उत्तम बजावली आहे.
IPL 2021मध्ये टी नटराजन पुन्हा एकदा सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना दिसणार आहे. SRH संघानं त्याचा फोटो शेअर करून यॉर्कर किंग असंही म्हटलं आहे.