IPL 2021 : अनेक भारतीय आणि जागतिक स्तरावरील क्रीडारसिकांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या विराट कोहली (Virat Kohli) यानं काही दिवसांपूर्वीच महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. आयसीसी टी 20 विश्वचषक स्पर्धेनंतर या फॉर्ममध्ये भारतीय संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याचं सांगितलं. ज्यानंतर आता विराटनं पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भावनिक मेसेजसह संघाच्या कर्णधारपदाचा त्याग 
विराट कोहलीनं एका अतिशय भावनिक मेसेजसह संघाचं कर्णधारपद सोडत असल्याचा निर्णय़ जाहीर केला. बंगळुरु संघाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. 


'आरसीबीमध्ये कर्णधार म्हणून हे माझं शेवटचं आयपीएल आहे. मी आयपीएलमध्ये आरसीबीचा खेळाडू म्हणून खेळत राहीनच. मी शेवटचं आयपीएल खेळत नाही, तोवर खेळाडू म्हणून खेळतच राहीन. सर्वच आरसीबी चाहत्यांचा माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि मला पाठिंबा दिल्याबद्दल आभारी आहे.'


वर्कलोड मॅनेज करण्याचं आश्वासन 
विराट पुढे म्हणाला, 'मी संघाशी याबाबत बोललो आहे. माझ्या डोक्यात हा विचार होताच. कारण मी हल्लीच टी 20 चं कर्णधारपद सोडलं आहे. जेणेकरुन मी त्या कामावर जास्त लक्ष देऊ शकेन ज्याचा ताण जास्त आहे. पुढे कसं जाता येईल, यासाठी मी सातत्यानं काही गोष्टी सुस्पष्ट करु इच्छित होतो. मी मॅनेजमेंटला सांगितलं आहे की बंगळुरूचा संघ सोडून मी इतर कोणत्याही संघाचा विचार करणार नाही.'


IPL मध्ये आरसीबीसाठीच खेळत राहीन...
विराटनं कर्णधारपदाचा त्याग करत बंगळुरू संघासाठीच्या आपल्या भूमिकेला पूर्मविराम दिला असला तरीही त्यानं संघातील खेळाडू म्हणून मात्र खेळत राहणार असल्याचं आश्वासन क्रीडारसिकांना दिलं आहे. 2008 पासून विराट सातत्यानं बंगळुरूच्याच संघातून खेळताना दिसत आहे. 2013 मध्ये त्याच्याकडे या संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं. 




विराटनं का घेतला हा निर्णय़? 
गेल्या 8 वर्षांपासून विराट आरसीबीच्या कर्णधारपदी विराजमान आहे. पण, आतापर्यंत तो या संघाला विजेतेपदी आणू शकलेला नाही. अशा वेळी त्याच्यावर असणारा दबाव सातत्यानं वाढत होता. याच कारणामुळं त्यानं कर्णधारपदाचा त्याग केला असल्याचं म्हटलं जात आहे.