मुंबई : आयपीएलचा पंधरावा हंगाम चुरशीचा आणि अनेक अनपेक्षित निकाल दाखवणारा आहे. सुरुवातीलाच चेन्नई, बंगळुरू आणि रोहित शर्माला मोठा धक्का बसला आहे. राजस्थान संघ चांगल्या रनरेटने पॉईंट टेबलमध्ये पहिलं स्थान मिळवलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीममधून ज्या खेळाडूंना फिटनेसचं कारण देऊन बाहेर काढलं त्यांनीच आज सुरुवातीचे सामने गाजवले आहेत. हे कोण खेळाडू आहेत आणि त्यांची आयपीएलमधील कामगिरी नेमकी काय आहे जाणून घेऊया. 


शिमरॉन हेटमायर हा राजस्थान टीमकडून खेळत आहे. त्याला राजस्थाननं 8.5 कोटी रुपये देऊन टीममध्ये घेतलं. त्याने हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात 13 बॉलवर 32 रन केल्या. त्याची आयपीएलमधील कामगिरी चांगली आहे तर तो अनफिट कसा असा प्रश्न पडला आहे. त्याला अनफिटचं सर्टिफिकेट देऊन संघातून बाहेर काढण्यात आलं होतं. 


श्रीलंकेच्या भानुका राजपक्षाला अनफिट असल्याचं सांगून टीममधून बाहेर काढण्यात आलं. पंजाब किंग्सकडून तो आताच्या हंगामात खेळत आहे. त्याने डेब्यूच्या सामन्यात 22 बॉलवर 43 धावा केल्या. यामध्ये 4 षटकारांचा समावेश आहे. पंजाबने बंगळुरूने दिलेलं लक्ष्य अगदी सहज पूर्ण केलं.